पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२० सार्थ श्रीज्ञानेश्वरी सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ९४ ॥ मग मी तो हैं आघवें । एक मीचि आधी स्वभावें । किंबहुना सामावे | समरसें तो ॥ ९५॥ मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः । निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः । सम० - मद्भक्त निःसंग ज्याला मी थोर करि मत्क्रिया । निर्वैर सव भूर्ती जो तो पावे मज पांडवा ॥ ५५ ॥ आर्या - मी तों परम जयाला मम अर्चक आणि नित्य मद्भक्त । निंवंर सर्व भूर्ती पावे मातें असंग तो युक्त ॥ ५५ ॥ ओवी - मद्भक्तीनें जाण । मी थोर करी है कीर्तन । सर्वभूतीं निर्वैर होणें । तो मजमाजीं सामावे ॥ ५५ ॥ जो मजचि कालागीं । कर्मे वाहतसे आंगीं । जया मजवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ९६ ॥ दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ | मजचि नाम ठेविलें ॥ ९७ ॥ मग भूतें हे भाप विसरला । जे दिठी मीच आहें सूदला । म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ९८ ॥ ऐसा जो भक्त होये । तयाचें त्रिधातुक हैं जें जाये । तें मीचि होऊनि ठाये | पांडवा गा ॥ ९९ ॥ ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ।। ७०० ॥ ययावरी तो पांडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ १ ॥ तेणें देवाचिया दोनही मूर्ति । निकिया न्याहाळिलिया चित्तीं । तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥ २ ॥ परि तयाचिये जाणिवे । झाला म्हणजे अहंकाराची फेरी संपते, आणि अहंकार लोपला कीं द्वैत आपोआपच मावळते. ९४ 'मी' आणि 'तो' हें सर्व स्वभावतःच 'मी' आहें असें होतें, किंबहुना तो भक्त माझ्याशीं अगदीं समरसून जातो. ९५ जो माझ्या प्रीत्यर्थच कर्मै आचरतो, ज्याला माझ्यावांचून जगांत कांहींच आवडत नाहीं, ९६ ज्याचे इहलोक आणि परलोक हे दोन्ही मीच आहे, ज्याच्या जीवनाचें सार्थक म्हणजे मीच, ९७ मग 'भूत' हा शब्दच जो विसरतो, कारण त्याच्या नजरेंत 'मी ' सर्वत्र भरलेला असतों, आणि अशा प्रकारें कोणताही वैरभाव मनांत न आणतां जो समबुद्धीने सर्वांना भजतो, ९८ असा जो कोणी भक्त होईल, त्याचा हा कफपित्तवातात्मक त्रिधातुक जड देह जेव्हां पडेल, तेव्हां अर्जुना, तो भक्त माझ्या रूपाशी समरस होऊन राहील. " ९९ संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, “ज्यांच्या उदरांत सर्व ब्रह्मांड मावतें इतके जे दांदिल आहेत व जे दयारसानें पाझरत असतात, ते श्रीकृष्णदेव अशा रीतीनें अर्जुनास बोलले. ७०० यानंतर त्या अर्जुनाला अत्यंत आनंद झाला, आणि श्रीकृष्णाची खरी खरी भक्ति करण्याचें चातुर्य या जगांत एक त्या अर्जुनाच्याच अंगीं आहे. १ त्यानें भगवंतांच्या दोन्ही मूर्ति चांगल्या न्याहाळून पाहिल्या, आणि त्याला विश्वरूपाहून कृष्णमूर्तीच अधिक आवडली. २ परंतु देवांनीं या त्याच्या आवडीचा आदर केला नाहीं, १ इहलोक व परलोक, २ कफ, पित्त, वात, या तीन धातूंचें बनलेलें जड शरीर,