पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४१९ तैसा मी एकीच परी । आतुडें गा अवधारीं । जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥ ८५ ॥ भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४ ॥ सम० - तो मी आत्मैक्यभक्तीनें ये रितीं शक्य अर्जुना । जाणायास पहायास प्रवेशायास तस्वतां ॥ ५४ ॥ आर्या - ऐसा मी परि एका भक्तीनें लभ्यही प्रवेशाया । जाणावया पहाया त मी सुलभ समज ऐशा या ॥ ५४ ॥ ओवी - मज पाहणें जाणणें देखणें । तें सर्व भक्तीचेनि गुणें । ऐसें मज जे जाणणें । तें मम रूपीं प्रवेशवी ॥ ५४ ॥ परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटका जैसी । धरांवांचूनि अनारिसी । गतिचि नेणे ॥ ८६ ॥ कां सकळ जळसंपत्ति । घेऊनि समुद्रातें विसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीच मिळे ॥ ८७ ॥ तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजी संचरे । मीचि होउनी ॥ ८८ ॥ आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥८९॥ तैसें मजलागुनी मुंगीवरी । किंबहुना चराचरी । भजनासि कां दुसरी | परीचि नाहीं ॥ ६९० ॥ तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणावें । जाणिला तरी स्वभावें । दृष्टही होय ॥ ९१ ॥ मग इंधनीं अनि उद्दीपे । आणि इंधन हे भाप हारपे । तें अमिचि होऊनि आरोपे | मूर्त जेविं ॥ १९२॥ कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें । मग उदैयां एकसरें । प्रकाशु होय ॥ ९३ ॥ तैसें माझिये साक्षात्कारी । मी जसा तुला आज सांपडलों आहें, तसा सांपडण्याला एकच मार्ग आहे. तो मार्ग कोणता, तें ऐक. जर अंतःकरण प्रेमळ भक्तीच्या स्वाधीन झाले, तरच मी असा साध्य होतों. ८५ परंतु ती भक्ति अशा प्रकारची पाहिजे, कीं पावसाची सुटलेली धार जशी पृथ्वीवांचून अन्यत्र जाऊंच शकत नाहीं, ८६ किंवा पाण्याचा सर्व सांठा बरोबर घेऊन नदी सागराला शोधीत जाते आणि इतरत्र कोठेही न वळतां त्यालाच मिळतेच मिळते, ८७ त्याप्रमाणें सर्व भावना एकवटून, प्रेमाला अनावर ऊत येऊन, भक्त माझ्या ठायीं संचरून, माझ्याशीं समरसून गेला पाहिजे. ८८ आणि भक्तानें ज्या मी स्वरूपीं समरस व्हायचे, तो 'मी' असा, कीं, जसा क्षीरसमुद्र कांठाला तसाच मध्येही क्षीराचाच असतो, ८९ त्याप्रमाणें लहान मुंगीपर्यंतही 'मी' आहे, किंबहुना अखिल स्थावरजंगम 'मी ' वेगळें नाहीं, ही एकच भक्तीची खरी जाति आहे, दुसरी नाहीं. ६९० अशी जेव्हां ऐक्यावस्था होईल त्याच क्षणीं माझें हें स्वरूपज्ञान होईल, आणि स्वरूपज्ञान झाले म्हणजे त्याचं स्वाभाविकपणे दर्शनही घडेल. ९९ मग, जसा लांकडाच्या ठिकाणीं अग्नि भडकतो, आणि, लांकूड ही भाषाच नाहींशी होते, कारण तें अग्निरूपच होऊन राहते, ९२ किंवा जोपर्यंत प्रकाशाचा आविर्भाव झाला नाहीं, तोंपर्यंत सर्व आकाशच अंधकारमय होऊन राहते, परंतु एकदां सूर्योदय झाल्याबरोबर एकदम जिकडे तिकडे प्रकाश होतो, ९३ त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचा साक्षात्कार १ पृथ्वीवांचून.