पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ते शिकवण सुभद्रापती । विसरलास मा ॥ ७४ ॥ अगा आंधळया अर्जुना । हाता आलिया मेरुही होय साना । ऐमा आथी मना । चुकीचा भावो ।। ७५ ।। तरि विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्हीं तुजपुढें । तें शंभूही परिन जोडे । तपें करितां ॥ ७६ ॥ आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणतात किरीटी । परि अवसरु नाहीं भेटी | जयाचिये ॥ ७७ ॥ तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ । ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥ ७८ ॥ आशेचिया अंजुळी | ठेऊन हृदयाचिया निडळीं । चातक निराळीं । लागले जैसे ॥ ७९ ॥ तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर । घोकीत आठही पाहार। भेटी जयाची ॥। ६८० ।। परि विश्वरूपासारिखें । स्वनींही कोण्ही न देखे । तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥ ८१ ॥ नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया । शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३ ॥ सम० - मी वेदीं न तप दान न पूजेंहिकरूनियां । पाहाया शक्य ये रीत तुवां देखियलें जसें ॥ ५३ ॥ आर्या-या परिचा मी दाने यज्ञ वेदं तपेंहि सायासें । शक्य पहायास नसें जैसे त्वां देखिलें अनायासें ॥ ५३ ॥ ओवी - वेद यज्ञ ज्ञानेंकरून । हैं रूप कोणा न दिसे जाण । तुवां पाहून झालें रूपाचे ज्ञान । आणिक कोणी पहावया शक्त नोहे ॥ ५३ ॥ पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा । सांहीसहित वोटा | वाहिला वेदीं ॥ ८२ ॥ मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही संभारा | नव्हेचि लागु ॥ ८३ ॥ आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें । जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥ ८४ ॥ मूर्तीला तूं सड्या मार्गाने म्हणजे निःसंगपणानें सेवावेंस, म्हणून जे नुकतेच तुला शिकविलें, तें विसरलास कीं काय ? ७४ अरे, आंधळ्या अर्जुना, हातीं मेरुपर्वत आला असतां, हा लहानच आहे, अशी तुझी चुकीची समजूत झाली आहे. ७५ पण तुला आम्हीं जें विश्वरूप दाखविलें, त्याचं दर्शन शंकरांनाही तपश्चर्येच्या बळाने होऊ शकत नाहीं. ७६ आणि अष्टांगयोगादि साधनांचे कट करणाऱ्या योग्यांनाही ज्याचा दर्शनयोग घडत नाहीं, ७७ तें विश्वरूप आम्हांला कधीं एकाद वेळ तरी कसे दिसेल, अशा विवंचनेत देवांचाही काळ जात आहे. ७८ आशेचे हात हृदयरूपी मस्तकावर जोडून (म्हणजे अत्यंत आशाळभूतपणें ) जसे चातक मेघाची वाट पहात आकाशाकडे टक लावून असतात, ७९ तसे सर्व मोठमोठे देव ज्याच्या दर्शनाची घोकणी सारखी आठी प्रहर करीत असतात, ६८० परंतु त्या विश्वरूपाचे नुसतें स्वप्नही त्यांना पडत नाहीं, तें विश्वरूप तूं आज सहजासहजी प्रत्यक्ष पाहिलें आहेस. ८१ अर्जुना, कोणत्याही साधनांना या विश्वरूपाजवळ येण्याला वाट सांपडत नाहीं. वेदांनीं आणि साही शास्त्रांनी या विषयांत माघार घेतली आहे. ८२ अर्जुना, माझ्या विश्वरूपाच्या मार्गाला लागण्याला भाराभर तपंही लागू पडत नाहींत. ८३ आणि दानादि पुण्यकर्मानाही हें कठीणच आहे. यज्ञाविधानांनींही कोणाला माझें ज्ञान तुझ्यासारखं सहजासहजी होऊं शकत नाहीं. ८४ १ कठीण.