पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४१७ रान । अहंकारेंसीं मन । देशधडी जाहलें ॥ ६४ ॥ इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली । ऐसी आपपरी होती जाली । शरीरग्रामीं ।। ६५ । तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती । आतां जिताणें श्रीमूर्ति । जाहलें इयां ॥ ६६ ॥ ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें । मियां तुमचें रूप देखिलें । मानुप हें ॥ ६७ ॥ हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥ ६८ ॥ जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवितं वांवेवरी । तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां ॥ ६९ ॥ आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा | हे भेटी नव्हे वहुँडा । मेघांचा केला ॥ ६७० ॥ जी सावियाचि तृपा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज ॥ ७१ ॥ माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेंसीं बुझावणी | जाहली मज ॥ ७२ ॥ श्रीभगवानुवाच- सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम । देवा अप्यस्य रूपस्य नित्य दर्शनकाङ्क्षिणः ॥ ५२ ॥ सम० – रूप देखणें कष्ट माझें जें देखिलें तुवां । या रूपाचें देव तेही सदा दर्शन इच्छिती ॥ ५२ ॥ आर्या-जे देखिलें तुवां रे अशक्य जें रूप तें पहायास । पाहों इच्छिति सुरही माझ्या रूपास ते महायास ॥ ५२ ॥ ओवी - माझें हें दुर्लभ स्वरूप । तुला दाखविलें अमूप पहावया करिती तप । देवांस दुर्लभ जें ॥ ५२ ॥ यया पार्थाचिया वोलासवें । हें काय म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ॥ ७३ ॥ मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । रान माजलें होतें. मीपणाच्या भानासह मन परागंदा झाले होते. ६४ इंद्रिये केवळ स्तब्ध, निश्चळ झाली होती. वाचाही निष्प्राण होऊन बोबडी वळली होती. अशी या माझ्या शरीराची बुर्दशा झाली होती. ६५ परंतु आतां तीं सर्व जीवंतपणें स्थितीवर येऊन मला भेटली आहेत; आणि या कृष्णमूर्तीच्या दर्शनानें मी आतां जीवंत आहे. असे मला वाटू लागले आहे. " ६६ असे आपल्या मनांत समाधानाचे उद्गार काढून तो श्रीकृष्णांना म्हणाला, “देवा, मी तुमचें हें मानवी रूप अवलोकन केलें; ६७ देवराया, हें रूप तुम्हीं मला दाखविलें म्हणजे तुम्हीं आईप्रमाणें चुकलेल्या मुलाला गोंजारून स्तनपान दिलेच म्हणावयाचे ! ६८ अहो, त्या विश्वरूपदर्शनाच्या समुद्रांत दोन हातांनी लाटांशी धडपडत होतों, तोंच या तुमच्या सगुणमूर्तिरूपी तीराला येऊन लागलो. ६९ अहो द्वारकानाथा श्रीकृष्णा, हें तुम्हीं मला दर्शन दिलेत असे नव्हे, तर या सुकून जाणाऱ्या झाडावर मेघवृष्टीच केलीत. ६७० अहो, स्वाभाविक तृषनें मी कासावीस झालों असतां, तुमचा सगुण आकार हा मला अमृतसिंधूच भेटला म्हणावयाचा! आतां, मी जीवंत आहे, असा मला भरंवसा आला आहे. ७१ माझ्या या अंतःकरणभूमींत हर्षाच्या वेलींची लावणी होत आहे, आणि आतां माझा सुखाशीं समेट झाला आहे ! ७२ हे अर्जुनाचे शब्द बाहेर पडल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणाले, “अर्जुना, हें असें भलतेच काय बोलतोस ? अरे, या विश्वरूपाविषयीं तूं प्रेमबुद्धीच बाळगावीस; ७३ आणि मग या माझ्या सगुण १ दुर्दशा, २ मोजीत, पकडीत. ३ द्वारका नगरीच्या सुहृदा (मित्रा ). ४ वर्षाव. ५३