पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥ ५५ ॥ ना तरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें । स्फुरे तत्त्व तेंवि पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ५६ ॥ तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हैं भलें जाहलें ॥५७॥ काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला । आपुलिया वाहीं उतरला । सातही सिंधु ॥ ५८ ॥ ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पांडुसुतें । विश्वरूपापाठीं कृष्णातें | देखोनियां ॥ ५९ ॥ मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसा देखों लागला अवनी | लोकांसहित ।। ६६० ॥ पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र | तैसेंचि देखे दोन्ही भागीं गोत्र । वीर वर्पताति शस्त्रास्त्र | संघाटवरी ॥ ६१ ॥ तया वाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु । धुरे वैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥ ६२ ॥ अर्जुन उवाच - दृष्ट्दं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन । इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥ ५१ ॥ सम० - नररूप तुझें सौम्य हें देखोनि जनार्दना । आतां असें बन्या वृत्तीं बुद्धिसी स्मृति पावलों ॥ ५१ ॥ आर्या - हें मानुषरूप तुझें पाहुनि सौम्य प्रसन्नचित्त असें । स्वस्थ प्रकृतिहि झाली वाटे मी जन्मलोंचि आजि अर्से ॥५१॥ ओवी - अर्जुन म्हणे जनार्दन । मनुष्यरूपातें देखोन । मोह गेला पळोन । ज्ञान मज जाहलें ॥ ५१ ॥ एवं मागितलें जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥ ६३ ॥ बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें अशा प्रकारचा मनुष्य अकस्मात् जागा होऊन जसा विस्मित होतो, तशी अवस्था आतां अर्जुनाची झाली. ५५ अथवा सद्गुरूंची कृपा झाल्याबरोवर जसें प्रपंचाचें भान हरपून जातें व खऱ्या तत्त्वाची स्फूर्ति होते, तशी श्रीकृष्णमूर्तिदर्शनानें अर्जुनाची स्थिति झाली. ५६ पार्थाला असें वाटलें, कीं, माझ्या डोळ्यांपुढे विश्वरूपाचा पडदा आला होता, तो आतां नाहींसा झाला, हें फार चांगलें झालें. ५७ जणूं काय आज आपण काळावर मात करून आलों, किंवा वादळी वाऱ्यालाही शर्यतीत मागें टाकून आलों, किंवा हातानें सरळ्या मारीत साती समुद्र आपण पार उतरलों, ५८ कांहीं अपरंपार आनंद, त्या विश्वरूपामागून हे कृष्णस्वरूप पाहतां क्षणींच, अर्जुनाला झाला. ५९ मग सूर्य मावळल्यावर जशा आकाशांत तारा दिसूं लागतात, त्याप्रमाणें त्याला आतां पृथ्वी आणि तिच्यावरील लोकसमूह हे दिसूं लागले. ६६० त्यानें आपल्या भोंवतीं पाहिलें, तों तेंच पूर्वीचें कुरुक्षेत्र त्याला दिसले, दोन्ही बाजूंना आपले भाऊबंदही त्याने पाहिले, त्या रणांत शूर योद्धे एकमेकांवर धूम शस्त्रास्त्रांचा मारा करीत होते. ६१ आणि त्या वीरांच्या बाणांच्या मांडवाखालीं त्यानें आपला रथही पूर्वीप्रमाणेच पाहिला; श्रीकृष्ण रथाच्या दांडीवर आहेत व आपण स्वतः खालीं जमिनीवर उभे आहों, असेंही त्यास आढळले. ६२ याप्रमाणे ज्याबद्दल त्या वीर्यशाली अर्जुनानें याचना केली होती, तेंच त्यानें पाहिलें, आणि तो म्हणाला, कीं, "आतां माझ्या जीवांत जीव आला. ६३ बुद्धीची जाणीव नाहींशी होऊन भयाचें