पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४१५ आटिजे पुढती ॥ ४४ ॥ तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें । तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥ ४५ ॥ हा ठाववरी शिष्याची निकैसी । साहाते गुरु आहाती कवणे देशीं । परी नेणिजे आवडी कैशी । संजय म्हणे ॥ ४६ ॥ मग विश्व व्यापनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें । तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये ॥ ४७ ॥ जैसें त्वंपद हैं आघवें । तत्पदीं सामावे | अथवा डुमाकारु सांठवे । वीजकणिके जेविं ॥ ४८ ॥ ना तरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेहली जीवदशा । श्रीकृष्ण योग तैसा । संहरिला तो ॥ ४९ ॥ जैसी प्रभा हारपली विंवीं । कीं जळदसंपत्ति नभीं । नाना भरतें सिंधुगर्भी । रिगालें राया ॥। ५५० ।। हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलून दाविली ॥५१॥ तंव परिमाणा रंगु । तेणें देखिला साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेच लागु । म्हणोनि घडी केली पुढती ॥ ५२ ॥ तैसें वाढीचेनि वहुवसपणें । रूपें विश्व जितिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥ ५३ ॥ किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परि आश्वासिलें पार्थातें । विहालियासी ॥ ५४ ॥ जो स्वमीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा हौसेसारखा दागिना केला, पण मग तो मनाला आला नाहीं, तर तो पुनः आटवावा, दुसरें काय ? ४४ त्याप्रमाणें या अर्जुन शिष्याच्या प्रेमामुळे देवांना करावे लागले. आधीं चतुर्भुज कृष्णरूप होतें, त्याचं विश्वरूप केले; पण तें शिष्याच्या पसंतीस उतरलें नाहीं, तेव्हां आतां पुनः कृष्णपण घडावें लागले ! ४५ आपल्या शिष्याची किरकिर इतक्या पल्ल्यापर्यंत सहन करणारे गुरु कोणत्या देशांत सांपडतील बरें ? पण अर्जुनाविषयीं येवढें गाढं वेडें प्रेम श्रीकृष्णानां कसें जडलें, कांहीं कळत नाहीं, असें संजय धृतराष्ट्राला म्हणाला. ४६ मग, जें दिव्य तेज सर्व सृष्टीला व्यापून भोंवतें पसरलें होतें, आतां सर्व त्या कृष्णरूपांत समाविष्ट झालें. ४७ जसें आत्मविचारणा करतां करतां ' त्वम् = तूं ' या पदाचा 'तत् = तं' या पदांत समावेश होतो, किंवा सर्व वृक्षस्वरूपाचा सूक्ष्म बीजांत अंतर्भाव घडतो, ४८ अथवा स्वप्नांतला व्यवहार जीवाच्या जागेपणांत लुप्त होतो, तसा श्रीकृष्णांनी आपल्या सगुण स्वरूपांत हा विश्वरूपाचा योग सांठवून घेतला. ४९ जशी सूर्याची कांति सूर्यात, किंवा मेघसमूह आकाशांत, अथवा समुद्राची भरती समुद्रांत लीन होते, तसेंच हे झाले. ६५० अहो, कृष्णमूर्तीच्या आकाराची विश्वरूप वस्त्राची घडी घातलेली होती, ती श्रीकृष्णांनी अर्जुनप्रेमानें प्रेरित होऊन त्याला बाहेर काढून उलगडून दाखविली. ५१ मग त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग चांगले पारखून पाहिल्यावर तें गि-हाइकाला पसंत पडत नाहीं असें म्हणून श्रीकृष्णांनी त्या वस्त्राची पुन्हां पूर्वीप्रमाणेच घडी केली. ५२ त्याबरोबर, अवाढव्य वाढीनें ज्या रूपाने सर्व व्यापून टाकले होतें, तेंच रूप आतां शांत, मनोहर, व गोजिरवाणं झालें. ५३ सारांश, त्या अनंत भगवंतांनी पुन्हां धाकटेपण पत्करले, पण भ्यायलेल्या अर्जुनाचे एकदां समाधान केले. ५४ स्वप्नामध्यं स्वर्गात गेलेला १ किरकिर.