पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी स्थानपती ॥ ३५॥ येरें वरिचिलेनि चित्तें । वाह्य सख्यसुखापुरतें । भोगिजो कां श्रीमृतीतें । चतुर्भुज ॥ ३६ ॥ परि पुढतपुढती पांडवा | हा एक बोलु न विसरावा । जे इये रूपींहूनि सद्भावा । नेदावें निघों ॥ ३७ ॥ हें कहीं नव्हतेंचि देखिलें । म्हणोनि भय जें तुज उपजलें । तें सांडीं एथ संचलें । असो दे प्रेम ॥ ३८ ॥ आतां करूं तुजयासारिखें । ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें । तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥ ३९ ॥ संजय उवाच - इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः । आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५० ॥ सम० - बोलूनियां ये रितिं वासुदेव तें अर्जुना दाखवि रूप देव । याला बहू देखुनि जो प्रताप आश्वासिला होउनि सौम्यरूप ॥ ५० ॥ आर्या-बोलुनि ऐसें पुनरपि दावी निज रूप तो तया श्वास । होउनि सौम्य श्रीहरि भ्याला जो पार्थ त्यासि आश्वासी ५० ओवी - संजय म्हणे देव ऐसें बोलोनी । आपुले रूप दाखविलें मागुतेनी । आश्वासिलें सौम्यरूप होवोनी । भ्यालिया अर्जुनासी ॥ ५० ॥ ऐसें वाक्य बोलतËवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परि नवलावो | आवडीचा तिये || ६४० || श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें की नावडे । अर्जुनासी ॥ ४१ ॥ वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूपण ठेविजे । ना तरी कन्या पाहूनियां म्हणिजे | मना न ये हे ॥ ४२ ॥ तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा । सेले दिधली से उपदेशा | किरीटीसि देवें ॥ ४३ ॥ मोडोनि भांगाराचा रखा । लेणें घडिलें आपलिया सेवा । मग नावडे जरी जीवा । तरी स्वरूपाच्या ठिकाणी कायमचें खिळवून टाकावेंस. ३५ बाकी, बाह्यात्कारें मनानें केवळ स्नेह- सुखलाभासाठी त्या चतुर्भुज कृष्णमूर्तीचं ध्यान करावें, ३६ पण, पुनः पुनः तुला सांगतों कीं, हा एक उपदेश मात्र विसरूं नकोस, कीं, विश्वरूपावरील श्रद्धा कधींच उडूं देऊ नये. ३७ हें कधीच पूर्वी पाहिले नव्हते, म्हणून तुला याचे भय वाटत आहे; पण तें भय सोडून, तूं याचेठायीं आपले सर्व प्रेम सांठवून ठेव." ३८ नंतर श्रीकृष्ण म्हणाले, "आतां तूं म्हणतोस त्याप्रमाणं आम्ही करतो; हे माझं पूवींचं रूप तूं खुशाल पोटभर पहा. " ३९ हे शब्द उच्चारल्याबरोबर तत्क्षणीच भगवंतांनी पुन्हां मानवी रूप धारण केलें. यांत कांहीं मोस नवल नाहीं, पण त्यांच्या अर्जुनाविषयींच्या प्रेमाचं मात्र नवल खरे ! ६४० श्रीकृष्ण म्हणजे रोकडे कैवल्यधाम, आणि त्यांनी आपले सारसर्वस्व जं विश्वरूप तं अर्जुनाला स्पष्ट उघडे केलें, पण तं कांहीं त्याला आवडले नाहीं. ४१ एकादी वस्तू मागून घेऊन ती टाकावी, किंवा रत्नामध्ये खोड काढावी, किंवा मुलीला पाहाण्याला जाऊन नाक मुरडावं, तसाच प्रकार अर्जुनानें केला. ४२ आपल्या उपदेशाचा शेलका भाग जे विश्वरूप, ते दाखविण्याइतकी श्रीकृष्णांनी अर्जुनावरील प्रीतीची वाढ केली, यापलीकडे त्यांनी काय करावयाचे राहिले ? १३ सोन्याची लगड मोडून, तिचा आपल्या १ शेलका - निवडक भाग. २ हौसेने