पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४१३ म्हणोनि ॥ २४ ॥ ना तरी सोनयाचा डोंगरु । येसैणा न चले हा थोरु । ऐसें म्हणोनि अव्हेरु । करणें घडे ।। २५ ।। देवें चिंतामणि लेईजे । कीं हैं ओझें म्हणोनि सांडिजे । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणोनि ॥ २६ ॥ चंद्रमा आलिया घरा । म्हणे निगें करितोसि उवारा । पडिसायी पाडितोसि दिनकरा । परता सर || २७ ॥ तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हाता आलें आहे सहज । कीं एथ तुज गजबज । होआवी कां ॥ २८ ॥ परि नेणसीच गांवढया | काय कोपों आतां धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ।। २९ ॥ हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें | प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ।। ६३० ।। तरि आझुनिवरी पार्था । सांडी सांडी हे व्यवस्था | इयेविषयी आस्था | करिसी झणें ||३१|| हें रूप जरी घोर । विकृती आणी थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ॥ ३२ ॥ कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घाली ठेवयापासीं । मग सधेनि देहेंसीं । आपण असे ॥ ३३ ॥ कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां । पक्षिणी अंतराळा । माजीं जाय ॥ ३४ ॥ ना गाय चरे डोंगरीं । परि चित्त वांधिलें वत्सें घरीं । तैसें प्रेम एथींचें करीं । टाळून जाईल काय ? २४ किंवा सोन्याचा डोंगर आढळला, पण 'हा एवढा मोठा हालणार कसा, असें म्हणून कोणी त्याचा अव्हेर करील काय ? २५ अरे, दैवबळाने लाभलेलें चिंतामणीचें रत्न अंगावर घालावें कीं ओझें म्हणून भिरकावून द्यावें ? पोसवत नाहीं या सबबीवर कामधेनूला बाहेर काढून वाटेला लावावी काय ? २६ चंद्र घरीं आला, तर त्याला म्हणावें, “ चल, निघ, आमच्या अंगाची लाही झाली !” किंवा सूर्य आला, तर म्हणावें, “ बाजूला सर, काळोख काय पाडतोस ! " हें कधीं शहाणपणाचें बोलणें ठरेल काय ? २७ त्याप्रमाणेंच माझ्या विश्वरूपाचें परम तेजस्वी ऐश्वर्य आज सहज तुझ्या हातीं आलें असतां, तूं असा कंटाळून, त्रासून जावास काय ? २८ पण तूं गांवढळ आहेस, तुला हे कांहींच कळत नाहीं. अर्जुना, आतां तुझ्यावर काय रागवायाचें आहे, पण तूं खरें शरीर सोडून, छायेलाच मिठी मारीत आहेस. २९. माझें हें खरें खरें स्वरूप असतां, तें खरें स्वरूप नाहीं, असें तूं समजतोस आणि याची धास्ती घेऊन, माझें जं सोंगाडें वरकरणी, चतुर्भुज रूप त्याबद्दल मात्र प्रेमभाव धरतोस ! ६३० तरी पण, अर्जुना, यापुढें हा मांड सोडून दे. याच्या नादीं पडूं नकोस. ३१ अरे, हैं विश्वरूप जरी भयंकर दिसतें; याचा विस्तार जरी प्रचंड आहे; तरी हे एकच खरे आहे, अशी तूं आपल्या अंतरीं खूणगांठ मारून ठेव. ३२ ज्याप्रमाणें कवडीचुंबक मनुष्याचं मन पुरलेल्या द्रव्याकडेच गुंतलेलें असतें, आणि तो रिकाम्या शरीरानें व्यवहार करतो, ३३ किंवा ज्याप्रमाणं आपला जीव मागें घरट्यांत, ज्यांना पंख फुटले नाहींत अशा आपल्या पिलांजवळ ठेवून, माता पक्षीण आकाशांत संचाराला जाते, ३४ किंवा गाय डोंगरांत चरत असते, पण तिचें वात्सल्यपूर्ण मन मात्र घरी असलेल्या वासराजवळ ठाम रहातें, त्याप्रमाणें तूं आपलें प्रेम या १ एवढा २ घरट्यांत, "