पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आर्या —काइयें शिखंडिनेंही त्या केला पृषदराजशूरानें । सात्यकिवीरें आणिक धृष्टद्युम्ने विराटवीरानें ॥ १७ ॥ पर्दे अभिमन्यूनें पृथक् पृथक् द्रौपदीय तनुजांनीं । वाजवुनी शंखांतें भरिलीं दाही दिगंतरें ज्यांनीं ॥१८॥ त्या धार्तराष्ट्रचित्तीं लागुन तो घोष तीव्र धाकाशीं । झाला तुंबळ ध्वाने हा भरिला पृथ्वींत आणि आकाशीं ॥ ओव्या- काशिराज धनुर्धर । शिखंडी महारथी वीर । धृष्टद्युम्न विराट थोर । सात्यकी अपराजित ॥ १७ ॥ पद आणि द्रौपदीसुत । सुभद्रापुत्र विख्यात । हेही मिळोनी समस्त | वेगळाले शंख वाजविले ॥ १८ ॥ तया नादाचेनि गजरें | दुमदुमलीं पाताळ शिखरें । दुर्योधनासि दुःखानळ भरे । हृदय फुटे खेदानें ॥१९॥ तेथ भूपती होते अनेक । दुपद द्रौपदेयादिक । हा काशिपति देख । महाबाहु ॥ ५१ ॥ तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥ ५२ ॥ विराटादि नृपवर । जे सैनिकमुख्य वीर । तिहीं नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥ ५३ ॥ तेणें महाघोप- निर्घातें । शेपकूर्म अवचितें । गजवजोनि भूभारातें | सांडूं पाहती ॥ ५४ ॥ तेथ तिन्ही लोक डळमळत । मेरुमंदर आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवे ॥ ५५ ॥ पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे ओमुडत । तेथ सडी होत । नक्षत्रांचा ॥ ५६ ॥ सृष्टि गेली रे गेली | देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं ॥ ५७ ॥ दिहाँचि दिन थोकला | जैसा प्रळयकाळ मांडला । तैसा हाहाकारु उठिला । तिहीं लोकीं ॥ ५८ ॥ तंव आदिपुरुष विस्मितु । म्हणे झणें होय अंतु । मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ।। ५९ ।। म्हणोनि विश्व संवरलें । एन्हवीं युगान्त होतें वोडवलें । जैं महाशंख आस्फुरिले | कृष्णादिकीं ॥ १६० ॥ तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला । तेणें दळभार विध्वं- सिला । कौरवांचा ।। ६१ ॥ जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । I तेथे अनेक राजे होते; द्रुपद, द्रौपदेय, महाबाहु काशिराज, अर्जुनपुत्र, अजिंक्य सात्यकी, राजा धृष्टद्युम्न, आणि शिखंडीही, तसेच विराटप्रभृति राजे इत्यादि जे मुख्यमुख्य शूर सेनाधिकारी होते, त्या सर्वानी शंख एकदमच वाजविले. ५१, ५२, ५३ त्या भयंकर नादाच्या दणक्याने पृथ्वीला सांवरणारे शेष व महाकूर्म हेही इतके घाबरले, कीं, ते पृथ्वीचा भार टाकून देण्यालाच सिद्ध झाले ! ५४ तेव्हां तीन्ही भुवनें डळमळूं लागलीं, मेरुमंदरादि पर्वत डोल खाऊं लागले, आणि समुद्र तर कैलासाइतका उंच उसळला ! ५५ पृथ्वीतळ कलंडूं लागलें, आणि आकाशाला असा हिसका बसला, की, नक्षत्रांचा खाली पेर पडला ! ५६ तेव्हां, “सृष्टि बुडाली हो बुडाली ! देवांचा आसरा तुटला !" अशी सत्यलोकांत एकच हाकाटी उठली ! ५७ दिवस असतांनाच सूर्य नाहींसा झाला, आणि जसा काय प्रळयकाळ ओढवल्यामुळे त्रिभुवनांत हाहा:कार उडाला ! ५८ तेव्हां आदिपुरुष जे श्रीकृष्ण, त्यांना आतां विश्वाचा खरोखर अन्त होणार अशी शंका येऊन, त्यांनीं तो क्षोभ शांत केला. ५९ म्हणूनच विश्व वांचले, नाहींतर कृष्णादिकांनी शंखनाद केल्याबरोबर खरोखरीच युगान्त झाला असता. १६० तो नाद जरी शांत झाला, तरी त्याचा प्रतिध्वनि मागें राहिलाच होता, आणि त्या प्रतिध्वनीनंच कौरवसेनेचा फन्ना पाडला ! ६१ ज्याप्रमाणें हत्तींच्या कळपांत ज्याला त्याला लीलेनें १ हिसडलें. २ पेर, दृष्टि, ३ निराश्रित अवस्था, अनाथ स्थिति ४ दिवसासच. ५ थांबला, खुंटला.