पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा श्रीभगवानुवाच — ४११ मया प्रसन्नेन तवार्जुनदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् । तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न पूर्वम् ॥ ४७ ॥ सम० - है अर्जुना तूज कृपानुरागें भ्यां दाविलें रूप निजात्मयोगे । अनंततेजोमयविश्वखाणी जें देखिलें तुजविणें न कोणी ॥ ४७ ॥ आर्या - म्यां रूप आत्म योगें तोपुनि तुज परम दाविलें तें जें । तुजविण अन्य न पाहे विश्व अनंताद्य युक्त जें तेजें ॥ ४७ ॥ ओवी - अर्जुना योगेंकरून । रूप दाविलें होऊनि प्रसन्न । हें तुजवांचून । देखिलें नाहीं कोणीं ॥ ४७ ॥ या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥ ९ ॥ कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणें काय नेणों बोलसी । काडु ऐसा ।। ६१० ।। आम्ही सांवियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिव म्हणे देणें । वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ।। ११ ।। तें हें तुझिये चाडे । आजि जीवाचेंचि दळवाडें । कामौनियां येवढें । रचिलें ध्यान ॥ १२ ॥ ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणोनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ १३ ॥ तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर । एथूनि ते अवतार | कृष्णादिक ॥ १४ ॥ हैं ज्ञानतेजाचें निखळ | । विश्वात्मक केवळ । अनंत हैं अढळ । आद्य सकळां ॥ १५ ॥ हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वी श्रुत दृष्ट नाहीं आना । जे जोगें नव्हे साधना । म्हणोनियां ॥ १६ ॥ न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुयैः । एवंरूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८ ॥ सम० - योगीं न वेदाध्ययनीं न दानीं कमौं न वा उग्र तपेंकरूनी । न सर्वथा शक्य जग पहाया मी आणिकां ये रितिं भक्तराया ॥ ४८ ॥ हे अर्जुनाचे शब्द ऐकून, त्या विश्वस्वरूपी भगवंतांना मोठें नवल वाटलें, आणि ते म्हणाले, कीं, "तुझ्यासारखा अविचारी मला कोठेच आढळला नाहीं ! अरे, ९ तुला केवढी अलौकिक वस्तु लाभली ! परंतु त्या लाभानें तुला सुख होत नाहीं ! मग, हें तूं काय भेकडपणाने बोलत आहेस, कीं कडपणाने बोलत आहेस, तें कांहीं समजत नाहीं. ६१० अरे, आम्ही जेव्हां साहजिक प्रसन्न होतों, तेव्हां या जडमर्यादेपर्यंतचेच सर्व कांहीं देतों; खऱ्या खऱ्या जीवाचा भक्त भेटल्याशिवाय हे जीवींचें रहस्य कोणास वरं द्यावें ? ११ आज केवळ तुझ्याचसाठी आम्ही आपल्या अंतरींचे रहस्य कमावून हैं विशाळ विश्वस्वरूप बनविले. १२ तुझा येवढा काय नाद आम्हांला लागला आहे, कांहीं समजत नाहीं ! पण आम्ही तुझ्यावर प्रसन्न होऊन वेडे झालों इतकं खरें, आणि आम्ही अंतरींच्या गूढ रहस्याची मूर्ति जगांत प्रत्यक्ष उभी केली आहे. १३ हे आमचे स्वरूप अपारापेक्षांही अपार आहे. यापासूनच कृष्णादि अवतार उत्पन्न झाले. १४ हें ज्ञानतेजाचे सारसर्वस्व आहे. हें विश्वस्वरूप शुद्ध, अंतहीन, निश्चळ आणि सर्वांचें मूळचीज आहे. १५ अर्जुना, हें यापूर्वी तुझ्याशिवाय कोणीही दुसऱ्याने पाहिले नाहीं कीं ऐकिलंही नाहीं, कारण हे कोणत्याही साधनानें लाभत नसतें. १६ १ साहजिक, २ जडशरीरापर्यंत मात्र ३ सारसर्वस्व, मगज,