पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१० सार्थ श्रीज्ञानेश्वरी किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव । तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रवाहां भव विश्वमूर्त ॥ ४३ ॥ सम० - करीं गदा चक्र किरीट माथां तें इच्छितों दर्शन कृष्णनाथा । जें या भुजांचं तव रूप स्वल्प तें दाविं हें झांकुनि उग्र रूप ॥ ४६ ॥ आर्या-चक्र किरीट गदा तें धीरं पहिले रूप तूं चतुर्बाहो । अमितकरा विश्वतनू त्या रूपें इच्छितों तुला पाहों ॥ ४६ ॥ ओवी - माथां मुगुट गदाचक्र करीं। पहावया इच्छितों अंतरीं । तें रूप तुझें ऐसें चतुर्भुज मुरारी । प्रकट करीं आतां ४६ कैसे नीलोत्पलातें रावित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित | इंद्रनीळा || ६०० || जैसा परिमळ जाहला मेरगजा । आनंदासि निघालिया भुजा । ज्याचे जानूवरी मकरध्वजा | जोडिली रव ॥ १ ॥ मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मस्तक मुकुटु झालें । शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥ २॥ इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलं शार्ङ्गपाणी । वैजयंतिया ॥ ३ ॥ आतां कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य सदा । कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥ ४ ॥ किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी । म्हणोनि आतां तुम्ही । तैसा होआवें ॥ ५ ॥ हे विश्वरूपाचे सोहळे || भोगूनि निवाले जी डोळे । आतां होताति आंधळे । कृष्णमूर्तीलागी ॥ ६ ॥ तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे । तें न देखतां थोडें । मानिताति है ॥ ७ ॥ आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं । म्हणोनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां ॥ ८ ॥ ज्याची अंगकांति निळ्या कमळाला निळेपणाचा मासला दाखविते, आकाशाला रंगानें खुलविते, आणि नीटमण्याला तेजस्वीपणा आणते; ६०० जसा पाचूमण्याला सुवास प्राप्त व्हावा किंवा आनंदाला कोंब फुटावा, त्याप्रमाणें ज्याच्या कमरेची शोभा मदनाला भूषविते, १ ज्या मस्तकावर मुकुट घातला आहे किंवा मुकुटालाच मस्तकाचा साज घातला आहे अशी भ्रांति पडते, कारण त्या अंगाची शोभात्र शृंगाराला भूषण झालेली आहे; २ इंद्रधनुष्याच्या कमानीवर जसे आकाशांत मेघ दिसावे, त्याप्रमाणे ज्या शार्ङ्गपाणीनें वैजयंती माळ घातलेली आहे: ३ आणि दैत्यदानवांनाही मोक्षदान देणारी ज्याची ती गदा कितीतरी उदार आहे, व, हे गोविंदा, ज्याचें तें चक्र अप्रतिम सौम्य तेजानें चमकत आहे, ४ अशा प्रकारचें तें गोजिरवाणें रूप पाहण्यास मी अधीर झालों आहे. म्हणून, देवा, आतां तुम्हीं तेच रूप धारण करावें. ५ अहो, या विश्वरूपदर्शनाच्या सोहळ्यांनी माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलें आहे; आणि आतां तुमची सौम्य कृष्णमूर्ति पाहण्यासाठीं हे हपापले आहेत. ६ आतां यांना त्या रेखीव साजऱ्या कृष्णमूर्तीवांचून दुसरें कांहींही पाहण्याचें सुचत नाही. त्या मूर्तीपुढे या विश्वरूपाची यांना कांहींच महती वाटत नाहीं. ७ आम्हांला त्या कृष्णमूर्तीवांचून इतरत्र कोठे भांग किंवा मोक्ष लाभणार नाहीं; म्हणून, देवा, हे विश्वरूप आतां आवरून, ते पूर्वीचें सगुण रूप धारण करा. ५ पाचूमण्याला २ हपापलेले. " ८