पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४०९ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि काइया करावी । किंबहुना पूर्वी । दृष्टा श्रुत ॥ ८८ ॥ तें हें विश्वरूप आपलें । तुम्हीं मज डोळां दाविलें । तरि माझें मन झालें । हृष्ट देवा ॥ ८९ ॥ परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोठी करावी | जवळीक हे भोगावी । आलिंगुनि तूतें ।। ५९० ।। तें याचि रूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखमी चावळिजे । आणि कवणा खेंव देइजे । तुज लेखा नाहीं ॥ ९१ ॥ म्हणोनि वारियासवें धांवणें । न ठके गगना खेंव देणें । जळकेळी खेळणें । समुद्रीं केलें ॥ ९२ ॥ यालागीं जी देवा । एथींचं भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा | जे पुरे हैं आतां ॥ ९३ ॥ पैं चराचर विनोद पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे । तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां ॥ ९४ ॥ आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें । शास्त्रातें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ।। ९५ ।। आम्हीं यजने किजती सकळे । परि तियें फळावीं येणेंचि फळें । तीर्थं होतु सकळें । याचिलागीं ।। ९६ ।। आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे । तया फळीं फळ तुझें । चतुर्भुज रूप ॥ ९७ ॥ ऐसीं तेथींची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडसवडी | वर्तत असे ते सांकडी । फेडिजे वेगीं ॥ ९८ ॥ अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्व वसवितेया । प्रसन्न होई पूजितया । देवांचिया देवा ॥ ९९ ॥ दिसण्याची गोष्टच बोलायला नको; सारांश, हे विश्वरूप पूर्वी कधीं पाहिलेलें आणि ऐकलेलंही नव्हतें. ८८ पण तेंच विश्वरूप तुम्हीं आज मला प्रत्यक्ष दाखविलेत, यानं माझें मन फारच आनंदित झाले आहे. ८९ परंतु माझ्या मनाला आतां अशी आवड वाटते, कीं, तुमच्याजवळ गुजगोष्टी बोलाव्या, तुमच्या सोबतीस असावें, आणि तुम्हांला गळामिठी घालावी ! ५९० आतां या तुमच्या विश्वरूपाच्याठायीं या गोष्टी करावयाचे म्हटले, तर या तुमच्या असंख्य तोंडांपैकीं कोणत्या तोंडाजवळ बोलावे आणि कोणाला आलिंगन द्यावें ? कारण तुमचें हें स्वरूप अमर्याद आहे ! ९९ मग वाऱ्यावरोवर कसें धांवावें, आकाशाला आलिंगन कसे द्यावें, आणि अफाट समुद्रामध्ये जलक्रीडा कशी करावी ? ९२ यामुळें, देवा, या तुमच्या स्वरूपाचें मला भय वाटतें, म्हणून माझी आतां इतकीच हौस आपण पुरवावी, कीं, आतां हे स्वरूप आपण आटोपून घ्यावें. ९३ हें स्थावरजंगम विश्व कौतुकानें अवलोकन केल्यावर जसें घरीं जाऊन स्वस्थ पडावेंसें वाटतें, त्याप्रमाणं तुमचें जें सौम्य चतुर्भुज स्वरूप आहे, तेंच आम्हांला विश्रामस्थान वाटते. ९४ आम्ही योगमार्गाचा अभ्यास केला, तरी अखेर हाच अनुभव घ्यायचा आहे; शास्त्रांचे मनसोक्त अध्ययन केले, तरी अंतीं हाच सिद्धांत पदरांत यायचा आहे. ९५ यज्ञयाग केले, तरी त्यांचें फळ हेच. तीर्थयात्रा ह्याचसाठी करावयाच्या ९६ यांशिवाय आणखी आम्हीं जें जें कांहीं दानपुण्य जोडावयाचें, त्याचंही फळ हेच तुझें चतुर्भुज रूप होय. ९७ अशा प्रकारची त्या रूपाविषयीं माझ्या अंतःकरणांत आवड आहे, म्हणून तें पाहण्याला मी फार अधीर झालों आहे. तरी येवढी माझी चिंता आपण लवकर दूर करावी. ९८ अहो, जीवींचं इंगित जाणणाऱ्या, सर्व विश्वास व्यापणाऱ्या, देवांनाही पूज्य, अशा देवाधिदेवा, आतां प्रसन्न व्हा. ९९ ५२