पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पूर्व हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मना मे । तदेव में दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५ ॥ सम० - अपूर्व हैं देखुनि हृष्ट झालों परंतु चित्तीं बहु फार भ्यालों । पूर्वी जसा दाखविं देह तैसा प्रसन्न होऊनि जगनिवासा ॥ ४५ ॥ आर्या-पूर्वी न देखियेलें उठले रोमांच यास पाहूनी । भयभीतमना मज तें दावीं रूप प्रसन्न होऊनी ॥ ४५ ॥ ओंवी -- कधीं नाहीं देखिलें तें देखून । हर्ष आणि भय पावलें माझें मन । आतां पहिलेच रूप दाखवीं प्रसन्न होऊन । देवा जगन्निवासा ॥ ४५ ॥ 1 तरि देवेंसी सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥ ७९ ॥ सुरतरूची झाडें । आंगणीं लावावीं कोडें । देयावें कामधेनूचें पाडें । खेळावया ॥ ५८० ॥ मियां नक्षत्रीं डाव पाडावा | चंद्र चेंडुवालागी आणावा । हा छंदु सिद्धी नेला आवघा । माउलिये तुवां ॥ ८१ ॥ जिया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाउस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास | चिंतामणि पेरिले ॥ ८२ ॥ ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥ ८३ ॥ मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाही भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥ ८४ ॥ जी कल्पादिलागोनि । आजिची घडी धरुनी । माझीं जेतुली होऊनी । गेलीं जन्में ॥ ८५ ॥ तयां आधवियांचिआंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचि ना ॥ ८६ ॥ बुद्धीचें जाणणें । कांहीं न वचेचि याचेनि आंगणें । हे सादही अंतःकरणें । करवेचि ना ॥ ८७ ॥ तेथ देवा, असें पहा, मी तुमच्याजवळ फारच लगट करून, 'मला विश्वरूप दाखवा म्हणून हट्ट घेतला, आणि तुम्हीं विश्वाच्या मायवापानी तो हट्ट मोठ्या प्रेमानें पुरा केला. ७९ कल्पवृक्षांच्या झाडांचं प्रदर्शन घराच्या अंगणांत करावें, कामधेनूची वासरे खेळायला द्यावीं, ५८० फांशांसारखें नक्षत्रांना सांगट्यांच्या डावांत ढाळावें, आणि चंद्राचा चेंडू करावा, अशा तऱ्हेचे माझे भलतेच छंद एकाद्या प्रेमळ माउलीसारखं तुम्हीं सिद्धीस नेलेत. ८१ ज्या अमृताचा एक लहानसा कण मिळण्यासही अपरंपार कष्ट करावे लागतात, त्या अमृताचा तुम्हीं चातुर्मास पाऊस पाडलात, आणि पृथ्वी नांगरून खांचराखांचरांतून चिंतामणीची पेरणी केलीत. ८२ देवा, अशा रीतीनें तुम्हीं मला धन्य केले; मोठ्या लाडाने पाळिलें; जं शंकराने व ब्रह्मचानें कानानें ऐकिलेही नाहीं, तें विश्वरूप मला प्रत्यक्ष दाखविलें. ८३ अहो, पाहण्याची गोष्ट दूरच राहो, पण जें उपनिषदांच्या विचाराच्या प्यांतही येत नाहीं, तें आपल्या जीवींचें रहस्य, आज तुम्हीं माझ्याकरितां गांठ सोडून, उघडे केलें आहे. ८४ महाराज, विश्वारंभापासून चालू घटकेपर्यंत मी जे जे जन्म घेतले, ८५ त्या सर्व जन्मांचा अगदी सडकून झाडा घेतला, तरी हे रहस्य पाहिल्याचा किंवा ऐकल्याचा प्रसंग आढळत नाहीं. ८६ अहो, बुद्धीच्या जाणतेपणाला या विश्वरूप रहस्याच्या अंगणांतही पाऊल घालवत नाहीं; आणि या अंतःकरणाला याच्या वांर्तचा गंधही नाहीं. ८७ मग अशी वस्तु डोळ्याला १ नांगरून २ खांचराखाचरांत.