पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४०७ काढी जी अपराध । समुद्रौनि मातें ॥ ६८ ॥ तुज विश्वसुहृदातें कहीं। सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज विश्वेश्वराचिया ठायीं । आश्चर्य केलें ॥ ६९ ॥ तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे । तरि मियां वल्गिजे क्षो । अधिकाधिक ॥ ५७० ॥ आतां ऐसिया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा । म्हणोनि रक्ष रक्ष प्रमादा- । पासोनियां ॥ ७१ ॥ जी हेंचि विनवावयालागीं । कैची योग्यता माझिया आंगीं । परि अपत्य जैसें सलगी । बापेंसिं बोले ॥ ७२ ॥ पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निद्रद्र । तैसें साहिजो जी ॥ ७३ ॥ सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत । तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥ ७४ ॥ प्रियाचिया ठायीं सन्मान । प्रिय न पाहे सर्वथा जाण । तेविं उच्छिष्ट काढिलें आपण । तें क्षमा कीजो जी ॥ ७५ ॥ ना तरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥ ७६ ॥ कां उखितें आंगेजीवें । आपण दिधलें जिया मनोभावें । तिया कांत मिनलिया न राहवे । हृदय जेवीं ॥ ७७ ॥ तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया । आणीक कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥ ७८ ॥ व्हा. या अपराधांच्या समुद्रांतून मला वांचवा. ६८ सर्व विश्वाचे हितकर्ते जे तुम्ही, त्या तुम्हांला सोन्याच्या नात्याने आम्ही कधींच फारसा मान दिला नाहीं. हे विश्वेश्वरा, तुमच्याशीं आम्हीं असें आश्चर्यकारक लाजिरवाणें वर्तन केलें आहे. ६९ वास्तविक पहातां नांवाजणीला योग्य तुम्हीं असतां, तुम्हींच भर सभेत माझी नांवाजणी केलीत, आणि मी मात्र मोठ्या आवेशानें अधिकाधिक बडबड केली. ५७० हे मुकुंदा, अशा प्रकारच्या माझ्या अपराधांना मोजच नाहीं; म्हणून आतां तुम्ही या अपराधापासून माझें रक्षण करा. ७१ अहो, अशी क्षमेची याचना करण्याचीही योग्यता माझ्या अंगीं नाहीं; परंतु ज्याप्रमाणें मूल आपल्या बापाजवळ लडिवाळपणानें बोलते, ७२ आणि मुलाचे जरी घोर अपराध असले, तरी ज्याप्रमाणें बाप दुजाभाव न ठेवतां निर्मळ प्रेमानें त्याचे अपराध क्षमा करतो, त्याप्रमाणें तुम्ही माझे अपराध क्षमा कराच कीं हो ! ७३ मित्राचा उद्धटपणा मित्र सहन करतो, तसे तुम्हीं हें सहन करावें, ७४ कारण आपल्या प्रियजनापासून सांप्रदायिक मानपानाची अपेक्षा कोणी करीत नाहीं. त्याप्रमाणेच, देवा, तुम्हीं आमच्या घरीं उष्टी काढलींत आणि आम्ही काढू दिलीं, याबद्दलही क्षमा करा. ७५ किंवा जीवश्च कंठश्च मित्र भेटला, म्हणजे जगांत अनुभवलेली सर्व संकटें त्याजजवळ सांगण्यास संकोच वाटत नाहीं; ७६ किंवा जिनें आपले मन, शरीर, व आत्मा, हीं तीन्ही एकदम पतीला अर्पण केली आहेत, अशा पतिव्रतेला पतीची गांठ पडली असतां, मन मोकळें करून बोलल्यावांचून राहवत नाहीं. ७७ त्याप्रमाणेंच हे सद्गुरुमहाराजा, मी ही तुमच्याजवळ विनवणी केली आहे. शिवाय, असें बोलण्याला आणखी एक कारण आहे. ७८ १ एकदम.