पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् । न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यां लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥ ४३ ॥ सम० -- पिता जगाचा सचराचराचा तूं पूज्य सवी गुरुवर्य साचा । न तुल्य कोणी तुज थोर देवा कैंचा त्रिलोकीं अतुळप्रभावा ॥ ४३ ॥ आर्या- स्थिर चर लोकांचा तूं बाप गुरु श्रेष्ठ आणि पूज्य महा । न तुजसमान अधिक कुणि त्रिजग तुझा प्रभाव अनुपम हा ॥ ४३ ॥ ओवी - तूं पिता चराचर लोकांसी । आणि गुरु पूज्य होसी । आणिक अधिक नाहीं तुजऐसी । त्रैलोक्यामाजी ॥४३॥ जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें । जे देवो होय चराचरात्रें । जन्मस्थान ॥ ६१ ॥ हरिहरादि समस्तां | देवा तूं परमदेवता । वेदातेंही पढविता । आदिगुरु तूं ॥ ६२॥ गंभीर तूं श्रीरामा । नानाभूतैकसमा । सकळगुणी अप्रतिमा । अद्वितीया ॥ ६३ ॥ तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें । तुवां जालेनि आकारों । सामाविलें जग ॥ ६४ ॥ तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे । तेथ अधिकचि कीजे । गोठी केवीं ॥ ६५ ॥ म्हणोनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसारिखा ना अधिक । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ॥ ६६ ॥ तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् । पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोदुम् ॥ ४४ ॥ सम० म्हणूनि वंर्दी पसरूनि काया प्रसन्न व्हावें मज देवराया । क्षमा करी जेवि पिता सुताला सखा सख्याला प्रियही प्रियाला ॥ ४४ ॥ आर्या - यास्तव साष्टांग नमीं प्रसन्न हो मज करीं क्षमा ऐशी । जैसी करि बाप सुता मित्र सख्या कीं प्रिय प्रिया तैसी ॥ ४४ ॥ ओवी — याकारणें तुला नमस्कारितों । जसा सखा सख्यासि तो। पुत्रासि पिता क्षमा करितो । तैसी कृपा करीं नारायणा ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें । तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥ ६७ ॥ मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सगद । देवा, आतां मला तुमचा महिमा पूर्ण समजला आहे; तो असा, कीं तुम्ही या स्थावरजंगम विश्वाचें मूळवीज आहां. ६१ हरिहरादि सर्व देवांचं परमदैवत आपणच आहां, आणि वेदांनाही तुमच्यापासूनच ज्ञान प्राप्त झाले आहे. ६२ प्रभो श्रीरामा, तुम्ही भूतमात्राशीं समभावानं व्यवहारतां; तुम्ही सर्व गुणांत अप्रतिम व अद्वितीय आहां. ६३ तुमच्यासारखें दुसरें कांहींच नाहीं, हें सांगायला तरी कशाला हवं ? तुम्हीं आकाश होतां, आणि हें सर्व विश्व त्यांत सामावतें. ६४ मग, अशा सर्वव्यापी तुमच्या तोलाचें कांहीं आहे, असें म्हणणं केवळ लज्जास्पद आहे. मग या विषयासंबंध आणखी तें काय बोलावें ? ६५ म्हणून त्रिभुवनांत तुम्ही एकटेच अद्वितीय आहां. तुमच्या बरोबरीचा किंवा तुमच्याहून वरचढ असा कोणीही नाहीं. तुमचा महिमा इतका विलक्षण आहे, कीं, त्याचं वर्णन करतां येत नाहीं. " ६६ असें अर्जुन बोलला आणि त्यानें दंडवत घातलें, आणि तत्काळ त्याला आठी सात्त्विक भावांचे भरतें आलें. ६७ मग तो गहिंवरानें दाटलेल्या वाणीनें म्हणाला, कीं, "देवा, प्रसन्न व्हा. प्रसन्न