पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४०५ जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे ॥ ५५० ॥ देवो बोर्नयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परि माझा नियुंग गर्व अवधारीं । जे फुगूनचि वैसें ॥ ५१ ॥ देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥ ५२ ॥ कृष्ण म्हणोनि हाकारिजे । यादवपणें तूतें लेखिजे । आपली आण घालिजे । जातां तुज ॥ ५३ ॥ मज एकासनीं वैसणें । कां तुझा बोलु न मानणें । हें वोटीचेनि दाटपणें । बहुत घडलें ||५४ || म्हणोनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशि आहें समस्तां । अपराधांची ।। ५५ ।। यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखीं । तियें मायेचियापरी पोटीं । सामावीं प्रभो ॥ ५६ ॥ जी कोही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें । तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥ ५७ ॥ तैसी प्रीती कां प्रमादें | देवेंसी मज विरुद्धे । बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥ ५८ ॥ आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे भूतग्रामा । म्हणोनि जी पुरुषोत्तमा । विनवं तें थोडें ॥ ५९ ॥ तरि आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधांसी ।। ५६० ।। अपराध इतका मोठा आहे, कीं, तो या त्रिभुवनांतही मावणार नाहीं ! पण, देवा, हे सर्व नेणतेपणानें आमच्याकडून घडलें, असें मी आतां तुमच्या पायाला हात लावून सांगतों. ५५० देवा, जेवणाच्या वेळीं तुम्हीं माझी आठवण करावी, परंतु माझा रिकामा ताठा इतका असे, कीं, मीं आपलें फुगूनच बसावें ! ५१ तुमच्या आरामगृहांतही आम्ही खुशाल खेळत असूं, आणि तुमच्या बाजूला भिडून अंथरुणावर निजत असूं. ५२ 'कृष्णा !' म्हणून तुम्हांला हांक मारावी, तुम्हांला इतर यादवांप्रमाणे लेखावें, आणि आमच्या हांकेकडे कानाडोळा करून तुम्ही जाऊं लागलां, तर तुम्हांला आपली शपथ घालून थांबवावें, असा आमचा क्रम होता ! ५३ एकाच आसनावर तुम्हांला खेटून बसणें, किंवा तुमचा शब्द मनावर न घेणें हें दाट घरोब्यामुळे माझ्या हातून पुष्कळ वेळां घडलें आहे. ५४ हे अनंत देवा, असे किती प्रकार म्हणून मीं सांगावे ? मी सर्व अपराधांचा राशीच आहे ! ५५ तेव्हां प्रभो, तुमच्या प्रत्यक्ष किंवा परोक्ष आम्ही जें कांहीं वेडेंबांकडे आचरण केलें असेल, तें सर्व तुम्ही आईप्रमाणे आपल्या ममतेच्या पोटांत घ्या आणि क्षमा करा. ५६ अहो, जेव्हां एकादे वेळी नया गढूळ झालेले पाणी घेऊन येतात, तेव्हां तेंही पाणी समुद्राच्या पाण्याला आपल्यांत सांठवून घ्यावेच लागते; त्याला दुसरी गतीच नसते. ५७ त्याचप्रमाणें प्रीतीने किंवा चुकीने आम्ही जें जें कांहीं तुमच्या विरुद्ध आचरलें असेल, तें तें प्रभो मुकुंदा, तुम्ही क्षमागुणानें सहन करावंच. ५८ आणि देवा, तुम्ही क्षमावान् असाल, तरच या भूतसृष्टीत क्षमा नांदणार आहे; म्हणून, अहो पुरुषोत्तमा, या गोष्टींत आम्ही कितीही विनवणी केली तरी थोडीच ! ५९ याकरितां, हे अत भगवंता, मी आपल्याला शरण आलों आहे, मला या सर्व अपराधांची क्षमा कराच! ५६० १ भोजनाच्या २ निर्लन. ३ आरामगृहांत, शयनस्थानांत. ४ परिचयान्या,