पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ४१ ॥ ययां कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलामि दातारा । ऐसा वैणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्हां ॥ ४२ ॥ तूं योगियांचे समाधिमुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥ ४३ ॥ यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु । एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ४२ ॥ सम० - शय्यासनीं भोजनिं चालतांही हास्यार्थ केला अपमान कांहीं । मागें पुढें हो मज देवराया क्षमा करीं अच्युत अप्रमेया ॥ ४२ ॥ आर्या- हास्यें करिता झालों सुखशयन क्रीडनाशनासन मी । एकांत लोकांत करीं क्षमा मी क्षमापनार्थ नमीं ॥ ४२ ॥ ओवी - विहार आसन भोजन शयन । असत्कारिला लीलाविनोदाकारण | अच्युता थोर अपराध झाला म्हणोन । क्षमा करावी खां स्वामिया ॥ ४२ ॥ तूं या विश्वाची अनादि आदि । बैससी जिये सभासदीं । तेथ सोयरीकीचिया संबंधीं । रेळीं बोलों ॥ ४४ ॥ विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों । न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥ ४५ ॥ पायां लागोनि बुझावणी | तुझ्या ठायीं शार्ङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी | बहु केली आम्ही ॥ ४६ ॥ स्वर्जनपणाचिया वीटा | तुजपुढें वैसें उफराटा । हा पांडु काय वैकुंठा । परि चुकलों आम्ही ॥ ४७ ॥ देवेंस कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां तस्करू । निकरेंही भांडों ॥ ४८ ॥ चांग तें उराउरी मागों । देवासि कीं बुद्धि सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥ ४९ ॥ ऐसा अपराध हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । या कौरवांच्या दाराशीं आम्ही तुम्हांला शिष्टाई-मध्यस्थी करण्याकरितां पाठविलें. याप्रमाणें, अहो जगदीश्वरा, आम्ही तुम्हांला आपल्या फायद्याकरितां जणूं काय विकतच घेतलें आहे ! ४२ अहो, योगी लोक समाधीत तुमचेंच ध्यान करून सुख भोगतात. परंतु मला मूर्खाला हें कांहींच कळलें नाहीं ! अहो, तुमच्यासमक्ष आजपर्यंत आम्ही थट्टामस्करी करीत आलों ! ४३ तुम्ही या विश्वाचें स्वयंसिद्ध बीज आहां. अशा प्रकारचे तुम्ही सभेत बसलां असतां, आम्ही सोयरकीच्या नात्यानें चेष्टाविनोदही केला. ४४ कधीं काळीं तुमच्या घरीं आलों, तुमच्या हातून आम्ही मानपान भोगले, आणि जर कधीं त्यांत अणुमात्र कमीपणा तुम्हीं केला, तर लडिवाळपणानें किंवा घरोव्याच्या अतिपरिचयाने रुसून जाण्याचा आविर्भाव आम्ही आणीत असूं. ४५ मग आमच्या पायां पडून आमची समजावणी तुम्हांला करावी लागे. देवा शार्ङ्गधरा, याप्रमाणें आम्ही बहुत वेळां तुमच्याबरोबर वागलों. ४६ स्नेह्याच्या नात्याने आम्ही तुमच्यापुढें अस्ताव्यस्त उलटे सुलटेही बसत असूं ! पण, देवा, हे आम्हांला योग्य होते काय ? छे, छे! आम्ही मोठीच चुकी केली. ४७ देवा, आम्ही कधीं कधीं तुम्हांला कोळदांडा घातला, आखाड्यांत तुमच्याबरोबर दंगामस्ती केली, आणि सोंगट्या खेळतांना खोटें दान देऊन उलट मोठ्या आवेशानें तुमच्याशीं तंडलों ! ४८ चांगली वस्तू पाहिली कीं ती आम्हांलाच आधीं पाहिजे म्हणून तुमच्याशीं हट्ट धरीत असूं. अहो भगवंता, तुम्हांलाही शहाणपणा शिकविण्यास आम्हीं कमी केलें नाहीं ! आणि कित्येक वेळां 'आम्ही काय तुझें लागतो ?' असे उपमर्दकारक शब्द तुम्हांला बोललेलो आहों. ४९ हा आमचा १ व्यवहाराकरिता २ थट्टामस्करी, ३ चेष्टाविनोदाने ४ तुझ्या स्वतःच्या हातून. ५ स्नेह्याच्या नात्यानें. ६ योग्यता, ७ खोटें दान देणारें,