पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४०३ सर्वा | सर्वात्मका ॥ ३२ ॥ जी अनंत वळसंभ्रमा । तुज नमो अमितविक्रमा । सकळकाळी समा । सर्वरूपा ।। ३३ ।। आघविया आकाशी जैसे अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥ ३४ ॥ किंबहुना केवळ | सर्व हें तूंचि निखिल । परि क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥ ३५ ॥ म्हणोनियां देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां । हैं आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ॥ ३६ ॥ सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति । अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ४१ ॥ सम० – जें बोलिलों मी सलगी करूनी रे यादवा कृष्ण सख्या म्हणूनी । न जाणतां या महिमेस देवा चुकोनियां प्रीतिकरूनियां वा ॥ ४१ ॥ आर्या-स्नेहें अणि प्रमादे नेणुनि महिमा सखा म्हणुनि सदया । वदलों हेंचि तुला मी हे कृष्णा हे यदुत्तमा सखया ४१ ओवी - ' हे यादवा !' म्हणोनि बोलिलों । ' कृष्णा ! सखया वदलों । प्रीतीनें जें बोलिलों । तें क्षमा कीजे ॥ ४१ ॥ परि ऐसिया तृतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणोनि सोयरे संबंधधर्मी । राहायलों तुजसीं ॥ ३७॥ अहा थोर वीउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वाँरिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥ ३८ ॥ परिसाचा खंडवाचि जोडला । तो फोडोनि आम्ही गौडोरां घातला । कल्पतरु तोडोन केला । कैप शेता ॥ ३९ ॥ चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिलीं । तैसी तुझी जवळीक धाडिली । सांगातीपणें ॥ ५४० ॥ हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण जुंझ हें केवढें । एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी करतां येत नाहीं, म्हणून, हे सर्वात्मक देवा, मी तुमच्या सर्वरूपाला एकदमच नमन करतों. ३२ देवा, ज्याचे बळाचा प्रभाव अनंत आहे, ज्याच्या पराक्रमाला मोजमाप नाहीं, जो भेदभावरहित असून सर्वरूप आहे, त्या तुम्हांला माझें नमन असो. ३३ ज्याप्रमाणें सर्व आकाशाला व्यापून अवकाशरूपानें आकाशच राहतें, त्याप्रमाणे तुम्हीच सर्वत्वाने सर्वाला व्यापून राहिलां आहां. ३४ किंबहुना, तुम्हीच हें सर्व विश्व आहां, परंतु क्षीरार्णवांत जसे क्षीराचेच तरंग उसळतात, तसाच हा संबंध आहे. ३५ म्हणून, देवा, तुम्ही या सर्व विश्वापासून निराळे नाहींच आहां, हें आतां माझ्या मनाला पूर्णपणे पटलें आहे; आतां हे सर्व तुम्हीच आहां. ३६ परंतु, महाराज, हें तुमचं स्वरूप आम्हांला मुळींच ज्ञात नव्हतें, म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आजपर्यंत सोयरसंबंधाच्या नात्यानं वागत आली. ३७ अहो, ही केवढी वावगी गोष्ट घडली ! अमृताचा आम्ही सारवणाला उपयोग केला ! कामधेनूच्या मोबदल्यांत आम्हीं शिंगरूंच घेतलें ! ३८ परिसाचा खडक सांपडला, पण तो फोडून आम्ही घराच्या पायाच्या गडग्यांत चिणला ! कल्पवृक्ष तोडून, त्याच्या कांटीची शेताला कुंपण घातली ! ३९ चिंतामणीची खाण सांपडावी, पण तिच्यांतील खड्यांचा उपयोग उनाड ओढाळ गुरे हांकलण्याकडे करावा. त्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत तुमची संगत केवळ सोबतीच्या नात्यांत घालविली ! ५४० फार लांब कशाला ? हा आजचाच प्रत्यक्ष प्रसंग पहा. केवस हे युद्ध, आणि यांत आम्ही तुम्हांला सारथी केलें आहे ! ४१ १ वाईट. २ कोकरूं, ३ खडक ४ गडयांत, ५ कुंपण.