पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी प्राणिगणीं वसता । अनि तो तूं ॥ ५२० ॥ वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम | आदिजनक तूं ॥ २१ ॥ आणीकही जें जें कांहीं । रूप आथी अथवा नाहीं । तया नमो तुज तैसयाही | जगन्नाथा ॥ २२ ॥ ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पांडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ २३ ॥ पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ २४ ॥ पाहत पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ २५ ॥ इयें चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयातें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ २६ ॥ ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्ये स्फुरती अनंतें । तंव तंव नमस्ते। नमस्तेचि म्हणे ॥। २७ ॥ आणीक स्तुतीही नाठवे । आणि निवांतुही न वैसवे । नेणें कैसा प्रेमभावें | गाजोंचि लागे ॥ २८ ॥ किंबहुना यापरी । नमन केलें सहस्रवरी | पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥ २९ ॥ देवासि पाठीपोट आयी कीं नाहीं । येणें उपयोग आम्हां काई । तरि तुज पाठिमोरेयाही | नमो स्वामी ॥ ५३० ॥ उभा माझिये पाठीसी । म्हणोनि पाठिमोरे म्हणावें तुम्हांसी । सन्मुख विमुख जगेंसीं । न घडे तुज ॥ ३१ ॥ आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा । म्हणोनि नमो तुज वायु आहां, सर्वांचें नियमन करणारा यम आहां, व सर्व प्राणिमात्रांत वसणारा अग्नीही आहां ५२० वरुण, सोम, सृष्टिकर्ता ब्रह्मदेव, आणि त्या विश्वपितामह ब्रह्मदेवाचा जनक, हे सर्व तुम्हीच आहां २१ याशिवाय आणखी जें जें कांहीं रूप असेल किंवा अरूप असेल, तें तें सर्व तुम्हीच आहां, अशा तुम्हांला, हे जगन्नाथा, नमस्कार करतों. ” २२ असें प्रेमळ मनानें पार्थानें नमन करून, तो पुन्हां म्हणाला, "प्रभो, मी तुम्हांला वंदन करतों, वंदन करतों. " २३ नंतर त्या श्रीकृष्णांची मूर्ति आपादमस्तक लक्षपूर्वक पाहून, अर्जुन पुन्हां उद्गारला, “नमस्ते, नमस्ते ! " २४ त्या मूर्तीचे निरनिराळे अवयवभाग पाहतां पाहतां त्याला अत्यंत समाधान झाले, आणि त्या भरांत पुन्हां म्हणाला, कीं, "प्रभो, नमस्ते, नमस्ते !" २५ या स्थावर जंगम जगांतील जीवमात्र पाहून, तो पुन्हां उद्गारला, “ प्रभो, नमस्ते, नमस्ते ! " २६ अशीं प्रभूंचीं अत्यंत आश्चर्यकारक अनंत स्वरूपें जों जों त्याला स्फुरूं लागलीं, तों तों अर्जुन “नमस्ते, नमस्ते ! " असेंच गाऊं लागला. २७ त्याला प्रभूची दुसरी काय स्तुति करावी हें आठवेना, आणि स्वस्थ मुकाट्यानेही बसवेना; आपण प्रेमभावाच्या भरांत काय घोषणा करीत आहों याचेंही त्यास भान राहिलें नाहीं ! २८ एकंदरीत, अशा प्रकारें त्यानें हजारदां नमन केलें; तरी पण तो म्हणाला, ' हे श्रीहरी, मी तुमच्यासमोर नमन करतों. २९ देवाला पाठपोट आहे कीं नाहीं, या प्रश्नाची आम्हांला कांहींच गरज नाहीं. तरीपण, महाराज, मी तुम्हांला पाठमोरंही नमन करतो. ५३० माझ्या पाठीमागं तुम्ही उभं आहां, म्हणून मी तुम्हांला पाठमोरे म्हणतो, पण वस्तुतः तुम्ही जगाला समोर नाही आणि पाठमोरेही नाहीं. ३१ आतां तुमच्या निरनिराळ्या अवयवांची रूपभेदाने मला वेगळीक