पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। अध्याय पहिला १५ गुण | काय वर्णू ॥ १४० ॥ ध्वजेवरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु । सारथी शार्ङ्गधरु | अर्जुनेंसीं ॥ ४१ ॥ देखा नवल तया प्रभूचें । अद्भुत प्रेम भक्ताचें । जें सारथ्य पार्थाचें । करितु असे ।। ४२ ।। पोइकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला । तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवैलीळाचि ॥ ४३ ॥ परी तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गहिरु। जैसा उदेला दिनकरु । लोपी नक्षत्रांतें ॥ ४४ ॥ तैसे तरबंबाळ भवते । कौरवदळीं गाजत होते । ते हारपनि नेणों केउ । गेले तेथ ॥ ४५ ॥ तैसाचि देखें येरें । निनादें अति- हिरें । देवदत्त धनुर्धरें | आस्फुरिला ॥ ४६ ॥ ते दोनी शब्द अचाट | मीनले एकवट | तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ ४७ ॥ तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौंड्र आत्राटिला । महाशंखु ॥ ४८ ॥ तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडला गहिरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु | आस्फुरिता जाला ॥ ४९ ॥ नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु । तेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥ १५० ॥ काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः । धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १७ ॥ द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते । सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक पृथक् ।। १८ ।। स घोषां धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् । नभञ्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १९ ॥ सम० - धनुर्धर महाकाश्य शिखंडीहि महारथी । अजिंक्य सात्यकी वीर धृष्टद्युम्न विराटही ॥ १७ ॥ द्रुपद द्रौपदीपुत्र अभिमन्यु महाभुज । शंख वाजविले यांहीं आपुलाले पृथक पृथक् ॥ १८ ॥ तो घोष धार्तराष्ट्रांच्या हृदयातै विदारुनी । आकाश आणि भूमीतें महातुंबळ गर्जवी ॥ १९ ॥ 1 गुणवर्णन कोठवर करावें ! १४० त्याच्या पताकेवर जो वानर होता, तो तर प्रत्यक्ष शंकरच आणि अर्जुनाजवळ असलेले शार्ङ्गधर श्रीकृष्णच सारथ्याच्या कामावर होते. ४१ अहो, पहा हे केवढे आश्चर्य ! त्या प्रभूचें भक्ताविषयींचें प्रेम इतकें अद्भुत आहे, कीं, ( त्या प्रेमानें बद्ध होऊन ) तो आपला भक्त जो अर्जुन, त्याचे प्रत्यक्ष सारथ्य करीत आहे ! ४२ कृष्णांनीं आपल्या दासाला- अर्जुनाला पाठीमागे घालून, ते स्वतः पुढे झाले व त्यांनीं आपला पांचजन्य शंख सहज लीलेनें फुंकिला. ४३ पण या सहज फुंकलेल्या शंखाचा महाघोष फार गंभीरपणें गाजला, आणि जशीं सूर्योदयाबरोबर नक्षत्रे लोपतात, ४४ तसेच कौरवसैन्यांत जे रणवाद्यांचे धूमधडाके गाजत होते, ते सर्व लोपून कोठें गडप झाले तें कळलेही नाहीं. ४५ त्याप्रमाणेंच धनुर्धर अर्जुनानें अत्यंत गंभीर आवाजाचा देवदत्त शंख वाजविला. ४६ हे दोन भयंकर शंखनाद जेव्हां एकत्र मिळून एकजीव झाले, तेव्हां या ब्रह्माण्डाचे शतशः तुकडे होतात की काय असें भासलें. ४७ इतक्यांत भीमसेनाला आवेश चढून तो महाकाळासारखा खवळला, आणि त्यानें आपला पौंड्र नांवाचा महाशंख वाजविला. ४८ तो शंखनाद प्रळयकाळच्या मेघांप्रमाणें गंभीरपणे गडगडला, तोंच राजा युधिष्ठिरानं आपला अनन्तविजय नांवाचा शंख घोपविला. ४९ त्याचप्रमाणें नकुळानें सुघोष व सहदेवानें मणिपुष्पक हे शंख वाजविले आणि त्यांच्या नादानं प्रत्यक्ष यमही गडबडून गेला ! १५० १ सेवक, २ सहज, लीलेनें. ३ गंभीर, खोल.