पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ ३८ ॥ सम० - विश्वादि तूं सर्व पुरीं पुराण तूं भूमि या विश्वघटीं निधान । ज्ञाताहि तूं ज्ञेयहि चित्स्वरूपा है व्यापिलें विश्व अनंतरूपा ॥ ३८ ॥ ४०१ आर्या-पुरुष परंधाम परम विश्वमया आदिदेव तमभेत्ता । विश्व व्याप्त तुवां है पुरातनानंत वैद्य तूं वेत्ता ॥ ३८ ॥ ओवी - तूं आदिदेव पुरुष पुरातन। तूं विश्वाचें परम निधान । तूं उत्कृष्ट ज्ञानयज्ञ । तूं अनंता व्यापिले विश्व रूपें ॥ ३८ ॥ तूं प्रकृतिपुरुषांची आदि । जी महत्तत्वा तूंचि अवधि । स्वयें तूं अनादि । पुरातनु ॥ १४ ॥ तूं सकळ विश्वजीवन | जीवांसि तूंचि निधान । भूतभविष्याचं ज्ञान | तुझ्याच हातीं ॥ १५ ॥ जी श्रुतीचिया लोचना | स्वरूपसुख तूंचि अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना | आयतन तूं ॥ १६ ॥ म्हणोनि जी परम । तूतें म्हणिजे महाधाम । कल्पांतीं महद्ब्रह्म । तुजमाजीं रिंगे ॥ १७ ॥ किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें । तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूतें ॥ १८ ॥ वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च । नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९ ॥ नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४० ॥ सम• तूं वायुअनींदुयमादि देव पितामहाचाहि पिता स्वमेव । नमो नमो तूज सहस्र वेळ नमो नमो मागुति सर्व काळ ॥ ३९ ॥ मागें पुढें वंदन लूज पायीं तूं सर्व वंदूं तुज सर्व ठायीं । अनंत सामर्थ्य पराक्रमी तूं सव पटीं जाणसि सर्व तंतू ॥ ४० ॥ आर्या - प्रपितामह प्रजापति तूं शशि वरुणानि वायु तो शमन । नमितों सहस्रदां मी मागुति करितों पुनः पुना नमन ॥३९॥ सर्वत्र तू सर्वा नमितों देवा पुढेहि अणि मागें । अतिविक्रम तूं व्यापिसि तुज नमिती सर्व लोक या मागें ॥ ४०॥ ओंध्या - वायु, अग्नि, वरुण, यम, । प्रजापति आणि सोम । प्रपितामह तूं महात्म । सहस्र नमनें पुनः पुनः ॥ ३९॥ भगणित पराक्रम तुझें वीर्य असें जाण । पूर्वपश्चि में तुज नमन। तूं सर्वांसि पावतोस म्हणवून । तूं ' सर्व ' होसी ४० जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी । हें असो जैसा आहासी । तैसिया नमीं ॥ १९ ॥ वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्रकृतिपुरुषांचं उगमस्थान तुम्हीच आहां. महत्तत्त्व जी माया तिचीही मर्यादा तुम्ही आहां. स्वतः अनादिसिद्ध पुरातन आहां. १४ तुम्ही सर्व विश्वाचें जीवन व मूळकारण आहां. भूतभविष्याचें ज्ञान तुमच्याच एकट्यांच्या हातांत आहे. १५ अहो भवरहित प्रभो, वेदांच्या डोळ्यांना तुमच्याच स्वरूपाच्या दर्शनानें सुख होतं. त्रिभुवनाच्या आधाराचा आधार तुम्हीच आहां. १६ म्हणून तुम्हांला 'परम महाधाम' असें म्हणण्यांत येतें; अहो, ब्रह्मप्रळयाच्या वेळीं महत्ब्रह्म जी महामाया ती तुमच्याच ठायीं प्रवेश करून लीन होते. १७ थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे हें सर्व विश्व तुम्हींच उत्पन्न करून पसरिलें आहे, मग हे अनंतरूप प्रभो, तुमचें वर्णन कोणाला बरें करता येईल ? १८ अहो, तुम्ही एकटे जं नाहीं, अशी वस्तु तरी काय आहे ? तुम्ही कोणत्या ठिकाणीं नाहीं ! पण हें आतां पुरे; तुम्ही जसे असाल, तशा तुम्हांला मी नमन करतों. १९ हे अनंता, तुम्ही ५१