पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०० अधिकाधिक सार्थ श्रीज्ञानेश्वरी त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा । | पैं । म्हणोनि पळताती दाही दिशां । पैलीकडे ॥ ५ ॥ एथ सुर नर किन्नर | किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर | नमस्कारित असती ॥ ६ ॥ कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसं ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे । अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ३७ ॥ सम० - न वंदिती कां तुजला समर्था जो थोर धात्यासहि आदिकर्त्ता । अनंत जो विश्वपटांत तंतु तूं सत् असत् अक्षर शुद्धही तूं ॥ ३७ ॥ आर्या- तुज जन न कां नमिति ते ब्रह्म्याला थोर आद्य तूं कर्ता । अव्यक्ता हुनि पर तूं अक्षर तूंही अनंत तूं भर्ती ॥ ३७ ॥ ओंवी – तूं श्रेष्ठ म्हणोनि नमस्कार करिती । ब्रह्मयाची तूं उत्पत्ती । ऐसी देवा स्थिती । सत् तूंचि ॥ ३७ ॥ एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥ ७ ॥ आणि हें काय तूतें पुसावें । येतुलें आम्हांसही जाणवे । तरी सूर्योदयीं रहावें । कैसेनि तमें ॥ ८ ॥ जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हांस गोचरु | म्हणोनियां निशाचरां केरु । फिटला सहजें ॥ ९ ॥ हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसें महिमा | गंभीर तुझा || ५१० ॥ जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महदब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥ ११ ॥ देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु । देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा || १२ || जी तूं त्रिजगतिये वोलावा | अक्षर तूं सदाशिवा । तूंचि सदसत् देवा | तयाही अतीत तें तूं ॥ १३ ॥ दुष्ट राक्षसांना तुम्ही महाभयंकर वाटतां, म्हणून ते दाही दिशांच्या पलीकडेही पलं पहात आहेत ! ५ आणि येथें आजूबाजूस हे देव, मानव, किन्नर, इतकेच नव्हत तर सर्व स्थावरजंगम विश्व, तुमच्या दर्शनानें आनंदित होऊन, तुम्हांला नमन करीत आहे. ६ पण, देवा, हे राक्षस तुमच्या चरणीं लीन न होतां पळ कां बरें काढीत आहेत ! ७ परंतु हैं तुम्हांला विचारायला कशाला हवें ? एवढी गोष्ट आम्हांलाही समजते ! अहो, सूर्यापुढे काळोखानें टिकावें तरी कसे ? ८ देवा, तुम्ही प्रकाशाचें उत्पत्तिस्थान आहां आणि असे तुम्ही लाभले असतां, हा राक्षसरूपी मळ झाडून जावा, यांत आश्चर्य कसले ? ९ हे इतके दिवस आम्हांला ही गोष्ट कांहींच उमगली नव्हती, पण, देवा श्रीरामा, आतां तुमचा सखोल महिमा आमच्या निदर्शनास आला खरा. ५१० ज्यापासून या विविध सृष्टीच्या रांगा निघतात, जेथून या भूतमात्राच्या वेली विस्तार पावतात, तें विश्ववीज महदूब्रह्मच तुमच्या महासंकल्पापासून उद्भवलें आहे. ११ देवा, अमर्याद व नेहमी स्वयंसिद्ध असें जें तत्त्व, तें आपणच आहां. तुमचे गुण पारहीन व अंतहीन आहेत. देवा, तुम्ही म्हणजे अत्यंत साम्याची अखंडित अवस्था आहां. तुम्ही सर्व देवांचे अधिपति अस. १२ देवा, तुम्ही या तीन्ही भुवनांचें जीवन आहां. तुम्ही अव्यय व नित्य मंगलस्वरूप आहां. तुम्ही सत् व असत् या दोहोंच्याही पलीकडे असणारें तत्त्व आहां. १३