पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३९९ श्रीअनंता । काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ॥ ९४ ॥ पैं तुज अखंडिता काळा | तिन्ही आहाती जी वेळा । त्या तिन्ही परी सवळा | आपुलालिया समयीं ॥ ९५ ॥ जे वेळीं हीं लागे उत्पत्तिं । ते वेळीं स्थितिप्रळयो हारपती । आणि स्थितिकाळीं न मिरवती । उत्पत्तिप्रळयो ॥ ९६ ॥ पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्तिस्थिति मावळे | हें काइसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥ ९७ ।। म्हणोनि आजि तंव भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें । एथ ग्रासिसी तूं हें न लगे। माझ्या जीवीं ॥ ९८ ॥ तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें । तें प्रत्यक्षचि तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ।। ९९ ।। हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां । तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥ ५०० ॥ मग म्हणतसे देवा । तूं सूत्री विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिती पुढती ॥ १ ॥ परि पंडिलियां दुःखसागरी । तूं काढिसी कां जयापरी । ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असें || २ || कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगीतसें महासुखाचा सोहळा । तेथ हर्पामृत कल्लोळा- । वरि लोळत आहें ॥ ३ ॥ देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग । आणि दुष्टां तयां भंग । घडूं शकणार नाहीं. ९३ अहो अनंतस्वरूपा देवा, चार प्रहर न भरतां, मध्यान्हींच कधीं सूर्य मावळेल काय ? ९४ खरोखर पाहतां, तुम्ही अस्खलित, संतत कालस्वरूप आहां; आणि तुमच्या तीन निरनिराळ्या कार्याच्या वेळा आहेत, आणि त्यांतील प्रत्येक वेळ आपापल्या अमदानींत सर्वसमर्थ असते. ९५ ज्या वेळेंत उत्पत्ति होऊ लागते, तेव्हां स्थिति व प्रळय यांचा अभाव असतो; आणि स्थितिकालांत उत्पत्ति व प्रव्य यांना ठिकाण नसतें. ९६ यानंतर प्रळयाची वेळ प्राप्त झाली, म्हणजे उत्पत्ति व स्थिति यांचा लोप होतो. ही ठरलेली सांखळी कोणत्याही कारणानें विस्वटित होत नाहीं. ती अनादि आहे. ९७ म्हणून, आजमितीस तर जगाचा ऐन उपभोगाचा स्थितिकाळ आहे; आणि अशा समयीं तुम्ही त्याला ग्रासण्यास पाहतां, हे माझ्या मनाला पटत नाहीं. " ९८ तेव्हां श्रीकृष्णांनी थोडक्यांत सांगितलें, कीं, " अर्जुना, या उभय सैन्याचें आयुष्य संपुष्टात आले आहे; ही गोष्ट मी तुला प्रत्यक्ष देखाव्याने दाखविली; परंतु, खरें पाहिलें, तर ती गोष्ट योग्य वेळींच घडून येणार आहे. " ९९ हे सूचक शब्द उच्चारण्याला जितका वेळ श्रीकृष्णांना लागला, तेवढ्या वेळांत अर्जुनाने हळूच मागे वळून पाहिलें, तो सर्व प्रकार जसा असावा तसाच यथास्थित आढळून आला. ५०० मग तो भगवंतांना म्हणाला, “देवा, ह्या विश्वाच्या नाटकाचे तुम्ही सूत्रधार आहां ! जग पुन्हां आपल्या पूर्वस्थितीला परत आलेले दिसलें. १ परंतु, दुःखसमुद्रांत गटंगळ्या खात असणाऱ्या जगाचें तुम्हीं तारण करतां, या कीर्तीची मला आठवण होते; २ आणि वेळोवेळी या कीर्तीचं स्मरण झाले म्हणजे जो अपरंपार सुखाचा सुकाळ अनुभवास येतो, त्यांतील आनंदामृताच्या लाटांवर मी नुसता तरंगत आहे ! ३ देवा, जीवंत राहिल्यामुळे हे जग तुमच्या ठायी प्रेमासक्त होत आहे आणि दुष्टांचा अधिकाधिक नाश होत आहे. ४ खरोखरच त्रिभुवनांतल्या