पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अगाधें । अनंतरूपें ॥८५॥ तें अर्जुनें मोटकें आइकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परी कांपिन्नलें । सर्वांग तयाचें ॥ ८६ ॥ सखोलपणें वळला मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । आणि वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवीं ॥ ८७ ॥ तेवींचि कांहीं बोलीं जाये । तंव गळा बुजलाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्हीं ॥ ८८ ॥ परि तेव्हां देवाचेनि वोलें । अर्जुना हें जाहलें । मियां पदांवरूनि देखिलें । श्लोकाचिया ॥ ८९॥ मग तैसाच भेण । पुढती जोहारूनि चरण । म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेति ॥ ९० ॥ अर्जुन उवाच - स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च । रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः ॥ ३६ ॥ सम० - यशें हृषीकेश तुझ्या स्थितींत है विश्व हर्ष अनुरागयुक्त । दिशांप्रती राक्षस जाति धार्के समस्तही वंदिति सिद्धलोकें ॥ ३६ ॥ आर्या-जग सर्व हृषीकेशा यर्शे तुझ्या हृष्ट आणि अनुरक्त । राक्षस पळति भयानें नमिती तुज सिद्धसंघ हे युक्त ॥३६॥ ओवी - अर्जुन म्हणे, नारायण । तुमचेनि कीर्ती संतोषी झालों जाण ! । भयें दशदिशा पळताति राक्षसगण । नमस्कार करिती सिद्धादिक ॥ ३६ ॥ ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा वोलु तुझा कीर अढळु | मानूं आम्ही ॥ ९१ ॥ परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हैं न मिळे | विचारासी ॥ ९२ ॥ कैसेनि आंगींचें तारुण्य मोडावें । कैंचें नव्हतें वार्धक्य काढावें । म्हणोनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी ॥ ९३ ॥ हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीकृष्ण, त्यांनीं - त्या अनंतस्वरूप भगवतांनी हे वाक्य गंभीर घोषवाणीनें उच्चारलें, ८५ तेव्हां तें अर्जुनानें चुटपुटतंच ऐकिलें, आणि मग तत्क्षणीं त्याला काय सुख वाटलें कीं भय वाटलें तें कांहीं सांगतां येत नाहीं, पण त्याचें सर्व अंग थरथर कांपूं लागलें. ८६ अहो, अत्यंत लीनपणानें त्याच्या शरीराची वळकटी झाली; आणि तसेच हात जोहून तो वारंवार श्रीकृष्णांच्या पायांवर मस्तक घोळं लागला. ८७ त्याप्रमाणेच आतां कांहीं बोलावें, असें त्याच्या मनांत आलें, पण त्याचा कंठच इतका भरून आला, कीं शब्दच बाहेर फुटेना ! मग, हें सुख होतें, कीं भय होतें, याचा तुम्हीच आपल्याशी विचार करा. ८८ हे मला कसें समजले म्हणाल, तर देवांचे बोल ऐकून अर्जुनाची अशीच अवस्था झाली असली पाहिजे, हे या श्लोकांतील शब्दांवरून मला स्पष्ट दिसतें. ८९ तसाच भीत भीत, चरणवंदन करून, अर्जुन म्हणाला, "देवा, आपण असें म्हणाला, कीं, ४९० मग 'अर्जुना, मी काळ आहे, आणि विश्वाला गिळणे हा माझा खेळ आहे !' देवा, ही तुमची वाणी अगदी अढळ सत्य आहे, असेच आम्ही मानतों. ९१ परंतु, आज विश्वाच्या स्थितीचा- अस्तित्वाचा काळ असतां, प्रळयकाळ आला नसतां, तुम्हीं काव्यस्वरूप प्रकट करून विश्वाला ग्रासावे; हे कांहीं विचाराच्या कसोटीस उतरत नाहीं. ९२ अंगींचं तारुण्य कसे काढून टाकावें, आणि त्याच्या ऐवजी अकालीच नसतं वृद्धपण कसें अंगावर घ्यावें ? म्हणून तुम्ही म्हणतां तें कार्य बहुतकरून