पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३९७ यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥ ७६ ॥ म्हणोनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं । न रिघें शोकसंकटीं । नाथिलिया ॥ ७७ ॥ आपणचि ओडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे । तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥ ७८ ॥ बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें । आतां राज्येशी संचलें । यश तूं भोगी ॥ ७९ ॥ सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद । ते वधिले विशद | सायासु न लगतां ॥ ४८० || ऐसिया इया गोष्टी | विश्वाच्या वाक्पटीं । लिहूनि घालीं किरीटी । विजयी होई ॥ ८१ ॥ एतच्छ्रुछ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी । नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५ ॥ सम० –ऐकोनि ही केशवशब्दद्घाटी कृतांजली कांपत से किरीटी । पुनःपुना वंदुनि कृष्णजीतें बोले गळा गद्गद भीतभीतें ३५ आर्या—कांपे भ्याल्यांहुनि भी कर जोडुनि कृष्णवचन पांडव तें ऐकुनि पुनरपि सद्गद बोले घडिघडि करोनि दंडवतें ॥३५॥ ओंवी – संजय म्हणे ऐसें वचन ऐकोनि कृष्णाचें । कंठ सद्गदिलें अर्जुनाचें । मग अंजळी जोडोनि तयाचे । मागुती भीत भीत स्तवीतसे ॥ ३५ ॥ ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्णमनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा | ज्ञानदेवो म्हणे ॥ ८२ ॥ मग सत्यलोकौनि गंगाजळ | सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । वोलतां तया ॥ ८३ ॥ ना तरी महामेघांचे उमाळे | घडघडीत एके वेळे । कां घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धि जैसा ॥ ८४ ॥ तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें | बोलिलें आपणच या वीरांना माझ्या तोंडांत पडतांना पाहिलेंस, तेव्हांच यांचे आयुष्य संपलें; आतां हीं जीं येथें दिसत आहेत, तीं नुसती निःसत्व सोपटें आहेत. ७६ यास्तव, तूं आतां झटपट ऊठ माझ्याकरवीं पूर्वीच मारले गेलेल्या या पुरुषांना मार; नसत्या कल्पित शोकांत गुंतून कुंथत वसुं नकोस. ७७ स्वतां नेम मारण्याचें निशाण उभें करावें, आणि मग त्याचा वाणानें वेध करावा, त्याप्रमाणेच, मी स्वतां कर्ता असतां, तुला केवळ दिखाऊ साधन केलें आहे. ७८ सख्या अर्जुना, तुला ज्या गोष्टीचें संकट पडलें होतें, ती गोष्ट आतां मुळांतच नाहींशी झाली आहे; आतां ज्यांत समस्त राज्यसुख सांठवले आहे, असे यश खुशाल उपभोग. ७९ 'स्वभावतःच जे भाऊबंद चढेलपणानें मस्त झाले होते व जे आपल्या बलाढ्यपणाने जगाला भारी वाटले होते, ते, अगदी सहजासहजीं, मुळींच आटापेट न करता, अर्जुनानें साफ नष्ट केले, ' ४८० अशा प्रकारची लिपी विश्वाच्या जिव्हेवर लिहून, बा अर्जुना, तूं विजय संपादन कर. " ८१ श्रोते हो, अशी ही सर्व कथा त्या निराश झालेल्या कौरवपति धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. ८२ मग सत्यलोकाहून सुटलेली गंगा प्रचंड घोषानें खळाळत खालीं यावी, तशा गंभीर वाणीने श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हां हे बोलले ८३ किंवा भयंकर मेघांचे ढीग सरासर वर येऊन त्यांनी एकदम गडगडाट करावा, किंवा क्षीराब्धीचे मंथन जेव्हां मंदर पर्वतानें केलें, त्या वेळीं त्या घुसळणाचा जसा आवाज खोल घुमला असावा, ८४ त्याप्रमाणेच जेव्हां विश्वाचें बीजभूत जे १ नेम मारण्याचे निशाण.