पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तैसा सैन्याचा यया वैगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा । म्हणोनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥ ६८ ॥ तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनात्र येकसरें । मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागविलें ॥ ६९ ॥ आतां हें त्याहूनि निपटारे जाहलें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनं ॥ ४७० ॥ आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥७१॥ द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्ण तथान्यानपि यांधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥ ३४ ॥ सम० - द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णास आणीकहि वीर त्यांस । म्यां मारिलें मारिं तुझ्या अदृष्ट आहे जयश्री झणि होसि कष्टी ॥ ३४ ॥ आर्या - भीष्म द्रोण जयद्रथ कर्ण तसे अन्यवीरही प्रथित। म्यां वधिल्यांस वर्धी तूं जिंकिसि रिपु युद्ध कर न हो व्यथित ३४ ओंवी – भीष्मद्रोणजयद्रथकर्ण । वीर सर्व मारिले जाण । आतां ऊठ तूं अर्जुन । शत्रू मारीं ॥ ३४॥ द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं । कैसेनि कर्णावरी । परजूं हैं न म्हण ॥ ७२ ॥ कोण उपावो जयद्रथा कीजे । हें न चिंतू चित्त तुझें । आणीकही आथी जे जे | नावाणिगे वीर ॥ ७३ ॥ तेही एकएक आघवे । चित्रींचे सिंहाडे मानावे | जैसे वोलेनि हातें घ्यावे । पुसोनियां ॥ ७४ ॥ यावरी पांडवा । युद्धाचा मेळावा । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥ ७५ ॥ जेव्हां तुवां देखिलें । हे माझिया वदनीं पडिले । तेव्हांचि उलटींसुलटीं पडतात, ६७ तसा या सैन्याचा सर्व मांड उलटून पाडण्याला मुळींच वेळ लागणार नाहीं. म्हणून, अर्जुना, लवकर ऊठ, ऊठच, आणि कांहींतरी शहाणपणा दाखव. ६८ तूं गोग्रहणप्रसंगी सर्व कौरवसैन्यावर एकदम मोहनास्त्राचा प्रयोग केलास, आणि मग सर्व सैन्य मूर्च्छत असतांना, विराटाचा भ्याड मुलगा जो उत्तर त्याच्याकरवीं त्यांचीं वस्त्रे हिरावून त्यांना नागवे उघडे करविलेंस. ६९ पण सांप्रतचें कार्य तर त्याहूनही सोपं झालं आहे; अरे, या रणांतील हें सैन्य पूर्वीच मरून पडलें आहे; आतां या आयत्या मेलेल्या सैन्याचा तूं बाह्यात्कारीं धुव्वा उडव, आणि एकट्या अर्जुनाने शत्रूंना रगडून विजय मिळविला,' अशी कीर्ति संपादन कर. ४७० शिवाय ही कीर्ति कांहीं नुसती कोरडी नाहीं, तर हिच्याबरोबर समस्त राज्यलक्ष्मीही हाती येणार आहे. तेव्हां या सर्व कार्यात, बा अजुना, तुला केवळ निमित्तमात्र होणें अवश्य आहे. ७१ 6 द्रोणांची पर्वा धरूं नको; भीष्मांचें भय मानूं नको; या कर्णावर हत्यार कसें चालवू, ही शंका घेऊ नको. ७२ या जयद्रथापुढें आतां काय करावें, अशा चिंतेत पडूं नको. यांशिवाय दुसरेही जे जे म्हणून नांवाजलेले वीर आहेत, ७३ ते ते सर्व तूं केवळ चित्रांतले प्रचंड सिंह आहेत, असें समज, आणि त्या चित्रांतल्या सिंहांप्रमाणेच यांना ओल्या हाताने पुसून टाकावें. ७४ इतकं सांगितल्यावर अर्जुना, या रणांतल्या सैन्याच्या जमावाचें काय महत्त्व राहिलें ? अरे, हा सर्व नुसता भ्रमाचा भोपळा आहे; खरें जें कांहीं होतें, तें मीं मागंच गट्ट केलें आहे ! ७५ जेव्हां तूं १ डौल, थाट, मोड,