पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३९५ संपदा । करित महाकाळेंसी स्पर्धा | वांटिवेचिया मदा | वळले जे ॥ ५९ ॥ म्हणती सृष्टीवरी सृष्टि करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । आणि जगाचा भरूं । घोंटु यया ।। ४६० ॥ पृथ्वी सगळीच गिळू । आकाश वरिच्यावरि जाळूं । कां वाणवरी खिळूं । वारयातें ॥ ६१ ॥ हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचे बळें । जेमावरी जगदळें । वाखाणिजताती ॥ ६२ ॥ बोल हातियेराहनि तिखट | दिसती अभीपरिस दासट । मारकपणे काळकूट । महेर म्हणत ॥ ६३ ॥ तरि हे गंधर्वनगरीचे उमाळे | जाण पोकळीचे पेंडवळे । अगा चित्रींचीं फळें | वीर हे देखें ॥ ६४ ॥ हां गा मृगजळाचा पूर आला | दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खांला | मांडिलिया पैं ॥ ६५ ॥ तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३ ॥ सम० - म्हणूनि तूं घे यश ऊठ वेगीं जिंकूनि हें राज्य समृद्ध भोगीं । म्यां शांति केली पहिलीच यांची निमित्तमात्रीं निघ सव्यसाची ॥ ३३ ॥ आर्या - यास्तव उठ तूं यश घे म्यां तों वधिले अधींच सर्व अजी । करिं युद्ध राज्य अपुले जिंकीं तूं हो निमित्तमात्र अजी ॥ ३३ ॥ ओंवी—याकारणें ऊठ तूं यश घेईं। वैरी जिंतोनि राज्य वाहीं । म्यां मारिले सर्वही । युद्ध निमित्तधारी हो अर्जुना ३३ ये चेष्टवितें जें वळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ । आतां कोल्हेरीचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ।। ६६ ।। हालविती दोरी तुटली | तरि तिये खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥६७॥ घमंड महाकाळाबरोबरच जणूं काय स्पर्धा करीत आहे ! अंगबळाचा माज त्यांना काय चढला आहे, पहा ! ५९ ते म्हणतात, 'आम्ही प्रतिसृष्टि निर्माण करूं ! प्रतिज्ञा करून मृत्यूलाच उलटें मारून टाकूं ! आणि या सर्व जगाचा केवळ एकच घोंट करूं ! ४६० सबंध पृथ्वीला गट्ट करूं, आकाशाला वरच्यावर जाळं आणि या वाणांनीं वान्याला एका जागी ठाम खिळवून ठेवूं !” ६१ ह्या ज्या सैनिकांच्या टोळ्या जमून आपल्या शौर्याच्या कृतींच्या तोऱ्यांत चुळबुळत आहेत, त्या आपल्या सैन्याची, यमापेक्षांही भयंकर म्हणून वाखाणणी करीत आहेत ! ६२ यांचे शब्द हत्यारांपेक्षां तिखट आहेत, यांची मुद्रा आगीपेक्षां दाहक आहे, आणि यांच्या घातकपणामुळे काळकूट विष केवळ गोडच ठरते. ६३ पण हे सर्व आकाशांत उठणारे ढगांचे वाडेहुडे, केवळ पोकळीचे पिंड आहेत; अरे, हे वीर म्हणजे चित्रांतील फळें आहेत. ६४ अर्जुना, हा मृगजळाचा लोंढा लोटला आहे. हा सैन्यभार नव्हे, तर कापडाचा साप आहे, अथवा हीं सजवून मांडलेलीं खेळणी आहेत ! ६५ खरोखर चैतन्याची तडफ दाखविणारे जे सैन्य, तें खरं सैन्य तर मी केव्हांच पूर्वी गिळून टाकले आहे, आतां जे वीर उरलेले दिसतात, ते नुसते कुंभाराच्या घरचे निर्जीव बाहुले आहेत. ६६ अरे, कळसूत्री बाहुल्यांना तोलून धरून, सुस्थितीत ठेवून त्यांच्याकडून हावभाव व नाच करवणारी दोरी तुटली, म्हणजे जसा कोणींही धक्का दिला दिसतां, तीं खांबावरचीं बाहुली धडाधड कोसळून १ अंगवळाच्या २ यमापेक्षां ३ मधुर, गोट ४ पिंड, गुताड, ५ चित्रांतील फळे, ६ खेळणी, कुंभाराच्या घरांतले पुतळे,