पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૩૬૪ सार्थ श्रीज्ञानेश्वरी श्रीभगवानुवाच — कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः । ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३९ ॥ सम० - जुनाट लोकांतक काळ मी तो लोकांस या येथ हरूं पहात । न मारिसी तूं तरि नासती हे सेनेत या जे नरवीर पाहें ॥ ३२ ॥ आर्या-मी लोक संहराया झालों काळ प्रवृद्ध ऐसा रे । योद्धे रणीं उभे जे तुजवांचुनि उतरतील हे सारे ॥ ३२ ॥ ओवी - देव झाला बोलता । म्हणे मी काळ लोकांचा संहर्त्ता । तुज वेगळें करोनि पार्था ! हे युद्धीं सर्व संहार पावती ३२ तर मी काळु गा हैं फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आहाती तोंडें । आतां ग्रासीन हैं आघवें ॥ ५१ ॥ एथ अर्जुन म्हणे कटकटा | उबगिलों मागिल्या संकटा । म्हणोनि आळविला तंव वोखटा । उ॑वाइला हा ॥ ५२ ॥ तेवींचि कठिण वोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणोनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥ ५३ ॥ तरि आतांचि ये संहारवारे | तुम्ही पांडव असा बाहिरे । तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥ ५४ ॥ होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला । मग लागला बोला। चित्त देऊं ॥ ५५॥ तंव ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझे हें जाणावें । येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥५६॥ वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हैं माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥ ५७ ॥ तरि तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इयें वायांचि सैन्यें पाहीं । वरळत आहाती ॥ ५८ ॥ ऐशा चतुरंगाचिया 66 बरें तर ऐक, मी खरोखरच काळ आहे, आणि लोकांचा नाश करण्यासाठींच वाढत आहे. हीं पहा माझीं असंख्य तोंडं वांसली आहेत, आतां हें सर्व चराचर मी गिळून टाकीन !" ५१ हें ऐकून अर्जुन मनांत म्हणाला, हाय, हाय ! मागल्या संकटानें त्रासलों, म्हणून यांची विनवणी केली, तर हे त्यावरही मात करण्याइतक्या दुष्टपणाने उसळत आहेत !” ५२ आणि श्रीकृष्णांनाही वाटलें कीं, या आपल्या कठोर उत्तरानें अर्जुन निराश होऊन हिरमुसला होईल, म्हणून ते लागलेच म्हणाले, “ अर्जुना, पण या सर्व कृत्यांत एक निराळीच खुबी आहे. ५३ ती ही की या सांप्रतच्या प्रळयाच्याबाहेर तुम्ही पांडव आहां. " हें ऐकून धीर येऊन अर्जुनानें आपले जाऊं पाहणारे प्राण सांवरून धरले. ५४ तो मरणाच्या दणक्यांत सांपडला होता, पण आतां भानावर आला आणि मग श्रीकृष्णांच्या बोलाकडे पुन्हां नीट लक्ष देऊ लागला. ५५ देवांनीं असें म्हटलें, कीं, 'अर्जुना, तुम्ही पांडव माझे आहां, हें ध्यानीं घे. तुम्हांला वगळून बाकी सर्व कांहीं गिळून टाकण्याला मी सिद्ध झालों आहे. ५६ भयंकर वडवाग्नींत ज्याप्रमाणे लोण्याची गोळी टाकावी, त्याप्रमाणं तूं पाहिलेले हें जग माझ्या तोंडांत पडलेले आहे. ५७ आणि यांत खोटें कांहींच नाहीं. ह्रीं जीं सैन्यं दिमाखानें वावरत आहेत, तें सर्व निष्फळ आहे. ५८ १ उठला, उसळला. या चतुरंग सैन्याच्या बळाची