पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३९३ न धरावी भीड | मनीं आहे तें उघड | वोल पां सुखें ॥ ४२ ॥ किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरि कृपा । मज पुरती पाहीं ॥ ४३ ॥ आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१ ॥ सम० -- तूं कोण पां उग्रतनू वदें हें प्रसन्न होईं तुज वंदिताहे । जाणों तुतं इच्छित से प्रवृत्ती नेणें तुझी देववराय मूर्ती ३१ आर्या- तूं कोण उग्ररूपी वद तुज नमितों प्रसन्न हो आद्या । तुज जाणों इच्छित प्रवृत्ति नेणें तुझी स्वसंवेद्या ॥ ३१ ॥ ओवी - तूं उग्ररूप मज सांग कवण । तुजला नमन होष प्रसन्न । पहिले रूप पाहों इच्छी मन तुझी प्रवृत्ति नकळे स्वामी ३१ तर एक वेळ वेदवेद्या | जी त्रिभुवनैकआद्या । विनवणी विश्ववंद्या । आई माझी || ४४ ॥ ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिले शिरें । मग म्हणे तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥ ४५ ॥ मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकेचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासि ॥४६ तरि तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवांचि करीं परिजिलीं । शस्त्रे काया ॥ ४७ ॥ जी जंवतंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥ ४८ ॥ एथ कृतांतेंसीं देवा । कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवां सांगावा | अभिप्राय मज ॥ ४९ ॥ या बोला म्हणे अनंतु । मी कोण हैं आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असें वाढतु । उग्रतेसीं ॥ ४५० ॥ तुम्हींही आप्तां भाडभीड न धरतां जें मनांत असेल तें खुशाल उघड बोलून टाका पाहू. ४२ अहो, हें भयंकर रूप आतां आणखी किती वाढवणार ? महाराज, आपले विश्वाला पाळण्याचें व्रत आठवा; नाहीं तर, निदान माझ्यावर तरी कृपा करा. ४३ म्हणून, वेदांनींच जाणण्यास योग्य, त्रिभुवनाचं मूळवीज व सर्व विश्वाला वंदनीय, अशा प्रभो, एक वेळ माझी विनंति ऐकाच. " ४४ असें म्हणून त्या वीर पार्थानें श्रीकृष्णांच्या चरणावर मस्तक लवविले, आणि मग तो म्हणाला, “अहो सर्वेश्वर प्रभो, इकडे लक्ष द्यावें. ४५ मी समाधान प्राप्त होण्यासाठीं, ' 'मला विश्वरूपदर्शन घडवा,' म्हणून म्हटले, आणि तुम्ही तर सर्व त्रिभुवन एकदम गिळंकृत करीतच उठला आहां ! ४६ तेव्हां, तुम्ही कोण ? हीं एवढीं असंख्य भयंकर तोंडं तुम्हीं कशाला जमविलीं आहेत ? आणि या सर्व हातांत हीं हत्यारे कशाकरितां पेलीत आहां ? ४७ अहो, तुम्हीं वाढतां वाढतां गगनालाही ठेंगणं म्हणण्याची पाळी आणली आहे ! है भयंकर डोळे वटारून तुम्हीं आम्हांला भय कां दाखवीत आहां ? ४८ हे प्रभो, सांप्रत तुम्हीं सर्वभक्षक यमाबरोबर ही चढाओढ कां मांडली आहे ? या कृत्याचा तुम्हीं आपला हेतु मला स्पष्ट करून सांगावा. ” ४९ यावर अनंतस्वरूप श्रीकृष्ण म्हणाले, " मी कोण आहे आणि उग्रपणा धारण करून कां वाढत आहें, हाच तुझा प्रश्न ना ? ४५० १ जगाचे पालन करण्याचें बाद. ५०