पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૧૨ सार्थ श्रीज्ञानेश्वरी खाखातें ठेलीं ॥३२॥ कैसें एकचि केवढे पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेंकलें । जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥ ३३ ॥ ऐसीं अपार वदनें । आतां येतुली कैंचीं त्रिभुवनें । कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविला सैंघ ॥ ३४ ॥ अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसीं वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ||३५|| आतां तैसें या विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें । कां जगजळचरां पांगिलें | काळजाळें ॥ ३६ ॥ आतां इये अंगप्रभेचिये वो गुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । ह्रीं वक्त्रें नोहेति जो हेरें । वोडवलीं जगा ॥ ३७ ॥ आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणें । परि जया लागे तया प्राणें । सुटकाचि नाहीं ॥ ३८ ॥ ना तरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हैं शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणे । विष जैसें ॥ ३९ ॥ तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परी ऐलीकडिले मुखीं खोई । हों सरली जगाची ॥ ४४० ॥ अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ॥ ४१|| तरि मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही डोंबाळा चढतो वाढतो, त्याप्रमाणे खादाडपणानें एकसारखी खात असणाऱ्या या तोंडांची खाखाई वाढतच आहे ! ३२ अहो, यांपैकीं एकच तोंड कसें वासलें आहे पहा ! याच्या जिभेवर टेंकलेलें त्रिभुवन म्हणजे यडवानीमध्ये टाकलेले जणूं काय कंवठच दिसत आहे ! ३३ अशा त-हेची या स्वरूपांत असंख्य तोंडें आहेत, पण आतां या सर्वाना पुरेसा आहार मिळण्याचा संभव नसतांनाही, ह्यांची संख्या एव्हढी कशाला वाढवली आहे, कोण जाणे ! ३४ हे प्रभो, हा विचारा जीवलोक या तोंडांच्या ज्वाळांत गुंतून पडला आहे, जणूं काय वणव्याच्या वेढ्यांत हीं हरणेच सांपडलीं आहेत ! ३५ सांप्रत या विश्वाची तशीच स्थिति झाली आहे. हा देव नव्हे, तर हा कर्मभोगच ओढवला आहे ! जगद्रूपी माशांना काळरूपी जाळ्यांत पकडल्यासारखेंच हें दिसतें ! ३६ आत या विश्वरूपाच्या अंगच्या तेजाच्या पाशांतून हीं चराचरें कशीं सुटणार ? अहो, हीं विश्वरूपाचीं तोंडें नव्हत, तर हीं जगावर ओढवलेली जळतीं लाक्षागृहेंच आहेत ! ३७ प्रखर उष्णतेनें पोटणें म्हणजे काय स्वतः आगीला कांहींच कळत नाहीं, पण ती प्रखर उष्णता ज्याला लागते त्याला मात्र प्राणाला मुकावे लागते, त्यावांचून सुटकाच नसते. ३८ किंवा ज्याप्रमाणें आपल्या तीक्ष्ण. पणाने मरण कसें येतें, याची शस्त्राला जाणीव नसते, किंवा ज्याप्रमाणें विष आपल्या मारक गुणाला आणत नसतें, ३९ त्याप्रमाणे, हे प्रभो, तुम्हांला आपल्या भयानक तीव्रपणाची मुळींच दाद नाहीं, पण या इकडल्या तोंडांत जगाची नुसती खाई झाली आहे ! ४४० देवा, जर तुम्ही सर्व विश्वव्यापक केवळ आत्मस्वरूप आहां, तर मग आज आमच्यावर असे काळासारखे घातक होऊन कां उसळत आहां ? ४१ असा प्रसंग आला आहे, म्हणून मीही आतां जीवाची आवड सोडली आहे; आणि १ पाशांतून. २ जळती लाक्षागृहें. ३ चर, खांच. ४ होऊं लागली.