पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आणि भयासुर रणकोल्हाळ | सुभटांचे ॥ ३३ ॥ आवेशें भुजा त्राहाटिती । विणैले हांका देती । जेथ महामद भद्रजांती | आवरती ना ॥ ३४॥ एकां उभेयांचि प्राण गेले । चांगांचे दांत वैसले । विरुदीचे दांदुले | हिंÎताती ॥ ३५ ॥ ऐसा अदभुत तुरंवंबाळु । आइकोनि ब्रह्मा व्याकुळु | देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥ ३६ ॥ ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ । माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥ १४ ॥ पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः । पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥ १५ ॥ अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः । नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १६ ॥ सम० - तो थोर रथ शुभ्राश्वीं युक्त एका रथीं तथा । दिव्य वाजविते झाले शंख माधवपांडव ॥ १४ ॥ हृषीकेश पांचजन्य देवदत्त धनंजयें । पौंड्रनामा महाशंख भीमें वाजविला बळें ॥ १५ ॥ राजा अनंत विजय शंखार्ते श्रीयुधिष्ठिर । माद्रीपुत्रीं वाजविले सुघोषमणिपुष्पक ॥ १६ ॥ आर्या—बैसुनि ते श्रेष्ठ रथीं संयुक्त श्वेतवर्ण हय ज्याशी । माधव आणिक पांडव वाजविती तेचि दिव्य जलजाशी १४ बीभत्सु देवदत्ता वाजवि तो कृष्ण पांचजन्यासी । वाजविलें पौंड्रासी भीमें जो नित्य सिद्ध युद्धासी १५ राजा अनंत विजया वाजवुनी जो करी महाघोषा । सहदेव नकुळ तैसा वाजवि मणिपुष्पकाभिध सुघोषा १६ ओव्या - श्वेतवर्ण घोडे महारथी । वरी पांडव श्रीपती । दिव्य शंख घेऊनि हातीं । वाजवीते जाहले ॥ १४ ॥ पांचजन्य घेतला कृष्णें । देवदत्त तो वीर अर्जुनें । भीम वृकोदर तेणें । पौंड्रशंख वाजविला ॥ १५ ॥ अनंतविजय गजरें । वाजविला युधिष्ठिरें। नकुलै सहदेव वीरें। मणिपुष्पक वाजविले ॥ १६ ॥ ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु । तंव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥ ३७ ॥ हो का निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें । जेथ गरुडाचिये जीवळिचे । कांतले चाही ॥ ३८ ॥ कीं पाखांचा मेरु जैसा । वरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥ ३९ ॥ जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण । तया रथाचे नौती, नगारे, मृदंगनाळा, शंख, झांजा, कर्णे, यांच्या नादधुमाळींत पराक्रमी वीरांचे भयंकर रणघोष मिसळले. ३३ कोणी भुजदंड थापटले, व कोणी चवताळून हांका फोडूं लागले. ज्या ठिकाणीं मदोन्मत्त हत्ती अनावर होऊन सुटले, ३४ त्या ठिकाणी कित्येकांचं उभ्याउभ्याच प्राणोत्क्रमण झालें, भल्याभल्या शूरांचीही दांतखिळी बसली, प्रतिज्ञेचे चंग बांधून आलेली मोठमोठीं धेंडेही थंडावलीं ! ३५ असा विलक्षण भयानक रणवाद्यांचा धडाका ऐकून ब्रह्मा भयाक्रान्त झाला, आणि देव तर, 'आज प्रलयकालच पातला कीं काय !' असे उद्गार काढू लागले. ३६ तो भयंकर रणकल्होळ ऐकून स्वर्गात अशा गोष्टी चालल्या आहेत, तोंच पांवडसैन्यांत काय घडलें ? ( तें ऐका). ३७ जो रथ रणविजयाचे जणूं काय सारसर्वस्व, किंवा महातेजाचें भांडारच होता, ज्याला ( वेगवत्तेमध्यें ) गरुडाचे जुळे भाऊच असे चार घोडे जुंपिले होते, ३८ किंवा जो उडत्या मेरुपर्वताप्रमाणे मिरवत होता, ज्याच्या तेजानें दाही दिशा कोंदाहून गेल्या होत्या, ३९ आणि ज्यावर वैकुंठींचा राणा नारायण स्वतः अश्ववाहक झाला होता, त्या रथाचें १ युद्धाविष्ट झालेले. २ हत्ती. ३ प्रतिज्ञा करून लढणारे बलाढ्य वीर. ४ थरथर कापू लागले. ५ रणवाद्यांचा कडाका. ६ जुळे भाऊ ( जोडीचे ). ७ जोडले. ८ रथ.