पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३९१ जळतया गिरीच्या गर्वखा । माजीं घापती पतंगांचिया झांकां । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती ॥२५॥ परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातैलिया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहिवेंटींहि पुसिलें | नामरूप तयांचें ।। २६ ।। लेलिह्यसं ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः । तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३० ॥ सम० - या सर्व लोकां गिळितोसि जेव्हां ज्वालामुखीं चाटिसि त्यांसि तेव्हां । प्रभा तुझ्या तीव्र जगा समग्रा व्यापूनि देवा तपताति उप्रा ॥ ३० ॥ आर्या - सर्वत्र दीप्त वदने लोकांचा करिसि भक्षुनी प्रास। कांती अत्युग्र तुझ्या तापविती या जनां समग्रांस ॥ ३० ॥ ओवी - तुझी मुखज्वाळाच जिव्हेचें ललन । तेणें होतसे सर्वलोकग्रसन । त्या ज्वाळे भरले त्रिभुवन । ऐसें विष्णो उग्ररूप तुझें ॥ ३० ॥ आणि येतुलियाही आरोगंण । करितां भुके नाहीं उणेपण | कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ||२७|| जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । कां भगणाँ दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । ओवाळु चाटितां ॥ २८ ॥ तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमित नवाई | भुकेलेपणाची ॥ २९ ॥ काय सागराचा घोंटु भरावा । कीं पर्वताचा घांसु करावा । ब्रह्मकटाहो घालावा | आधवाचि दाढे ॥ ४३० ॥ दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि व्याविया । ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य वा तुझें ॥ ३१ ॥ जैसा भोगी कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे । तैसीं खातखातांचि तोंडें । जळत्या पर्वताच्या खोऱ्यांमध्ये जशा पतंगांच्या झुंडीच्या झुंडी येऊन पडतात, तसे हे सर्व लोक या तोंडांत उड्या घेत आहेत. २५ परंतु तापलेले लोखंड जसें पाणी गिळतें, तसें, या तोंडांत जें जें पड़तें, तें तें खाक होत आहे; त्याचे सर्व नांवगांव वहिवाटींतून पार पुसून जाऊन नाहींसें होतें. २६ आणि एवढचा अन्नाचा फडशा पाडूनही, याची भूक यत्किंचितही कमी होत नाहीं, तिला कांहीं विलक्षणच तीव्रपणा आला आहे. २७ जसा एकादा रोगी तापांतून उठावा किंवा भिकाऱ्याला दुष्काळ पडावा, त्याप्रमाणें ओठ चाटीत असतां लळलळणाऱ्या जिभा भासत आहेत. २८ शिवाय, या तोंडाला अमुक एक खाण्यासारखें नाहीं असें कांहींच राहिले नाहीं. ही भुकेची परी नवल करण्यासारखी खास आहे ! २९ या समुद्राचा काय एक घोंट करूं कीं या पर्वताचा एक घांस करूं, कीं हें ब्रह्माण्ड एकदमच दाढेखालीं भरइं, की या सर्व दशदिशा गटकन गिलं, कीं या चांदण्या चाटून टाकू, अशा थाटाचं, हे प्रभो, तुमच्या या स्वरूपाचें स्वाभाविक हांवरेपण दिसत आहे ! ४३०, जसा विषयसेवनाने कामविकार अधिकाधिक बळावतो, किंवा सर्पण पुरवल्याने आगीचा ३१ १ दरी, गुहा. २ झुंडी, ३ तापलेल्या ४ वहिवाटीतून, व्यवहारांतून ५ भोजन, ६ तीव्रपण. ७ भिकाऱ्यानें, ८ ओठ,