पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९० सार्थ श्रीज्ञानेश्वरी चोखडीं । इयें उत्तमांगें होतीं फुडीं । म्हणोनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥ १८ ॥ मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहेरच नाहीं । जग आपैसेंचि वदनडोहीं । संचरताहे ॥ १९ ॥ यया आपेंआप आघविया सृष्टि । लागलिया आहाति वदनाचिया वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥ ४२० ॥ ब्रह्मादिक समस्त | उंचा मुखांमाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीचि वदनीं ॥ २१ ॥ आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परि यात्रिया मुखा निम्रांत । न सुटेचि कांहीं ॥ २२ ॥ यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८ ॥ सम० - नदीजळें जेविं बळें वहाती वेर्गी समुद्राभिमुखंचि येती । ज्वालामुखीं या तुझिया अनेकीं प्रवेशती वीरहि जे नृलोकीं ॥ २८ ॥ आर्या - सागरसन्मुख जाती वेग नद्यांचे जसेहि नीरांचे । तेविं तुझ्या दीप्तमुखीं समूह निघती नृलोक वीरांचे ॥ २८ ॥ ओंवी — जैसीं सरिता उदकें वाहती । तीं अवघीं सागरीं मिळती । तैसे नरलोक भूपती । तव वदनीं प्रवेशले ॥२८॥ जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवांचि कडूनि जग । प्रवेशत मुखीं ||२३|| आयुष्य पंथें प्राणिगणीं । करोनि अहोरात्रांचीं सोवाणीं । वेगें वक्त्रमिळणीं । साधिजत आहाती ॥ २४ ॥ यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः । तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९ ॥ सम॰—कीं पेटल्या अग्निमधें पतंग येती मरायासि करूनि वेग । तैसे मराया निघताति लोक वेर्गे तुझ्याही वदनीं अनेक २९ आर्या - जैसे दीप्तानिमधें वेगेंचि पतंग पडुनि मरताती। तैसे वदनीं तुझिया मरावया लोक शीघ्र शिरताती ॥ २९ ॥ ओवी - जाज्वल्य दीपावरी । जैसा पतंग रिघे अवधारीं । तैसे नाशावया मुखाभीतरी । प्रवेशती लोक ॥ २९ ॥ सर्व शरीरांमध्ये हीं मस्तकेंच खरोखर उत्तम होतीं, म्हणून तीं महाकाळाच्या तोंडांत पडूनही अखेरीस टिकून राहिली. " १८ पुढें अर्जुन म्हणूं लागला, कीं, “ जो जन्माला आला, त्याला दुसरा मार्गच नाहीं. हं जग आपण होऊनच या खोलच खोल तोंडांत शिरत आहे, नाहीं का ? १९ या सर्व प्रकारच्या सृष्ट वस्तु आपोआप या तोंडाच्या वाटेला जात आहेत, आणि हा विश्वरूप महाकाळ जेथल्या तेथेच ठाम राहून सगळ्यांना जवळ आल्याबरोबर स्वस्थपणें कवळीत आहे ! ४२० ब्रह्मदेवादि सर्व वरच्या उंच तोंडांत शिरत आहेत, तर हे सामान्य भारती वीर अलीकडच्या ठेंगण्या तोंडांत शिरत आहेत. २१ दुसरें कांहीं भूतमात्र उपजलेल्या ठिकाणींच ग्रासले जात आहे. परंतु याच्या तोंडाच्या तडाख्यांतून कोणी निसटलें आहे, असे मात्र मुळींच आढळत नाहीं. २२ जसे मोठ्या नद्यांचे प्रवाह अतित्वरनं समुद्राच्या विस्ताराला जाऊन मिळतात. तसें सर्व दिशांनी येऊन हें जग या मुखांत शिरत आहे. २३ हे सर्व प्राणी आयुष्याच्या वाटेवर रात्रिदिवसांच्या पायऱ्या करून मोठ्या वेगानें या तांडांत शिरण्याची पर्वणी साधीत आहेत ! २४ १ मार्ग, २ पायन्या,