पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३८९ परि वायांचि व्याकुळता । ते न चोजवेचि पांडुसुता । मग अहा कंपु नव्हता | वाढवित असे ॥ ९॥ वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि । केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७ ॥ सम० - मुर्खे तुझीं सत्वर त्यांत जाती भयानकें जीं विकराळ दांतीं । दांतांतही चर्वित वीरकाया ज्यांची शिरं चाविसि देवराया ॥ २७ ॥ आर्या- दंष्ट्राकराल भ्यासुर जीं वदनें रिघति त्यांत संपूर्ण । दांतांत लागले जे कोणी त्यांचीं शिरं दिसति चूर्ण ॥ २७ ॥ ओवी - ऐशा भयानक मुखा भीतरी । एक रिघतां भडकले दाढेमाझारीं। एक चूर्ण मुखांतरीं। शिरें अडकलीं मज दिसताती तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सौसिकवचेंसीं दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥ ४१० ॥ कां महाकल्पाचिया शेवटीं । जें कृतांत कोपला होय सृष्टी । तें एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे ||११|| ना तरी उदासीनें दैवें । संकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥ १२ ॥ तैसी सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इयें मुखीं जाहलीं प्रविष्टें । परि एकही तोंडौनि न सुटे | कैसें कर्म देखा || १३ || अशोकाचे अंगवसे । चघळिलें कन्न जैसे। लोक वक्रामाजीं तैसे । वायां गेले ॥१४॥ परि सिसौळे मुकुटेंसीं । पडिलीं दाढांचे सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥ १५ ॥ तियें रत्नें दांतांचिये सर्वेडीं । कूट लागलें जिभेच्या वुडीं । कांहीं कांहीं आगैरडीं । दंष्ट्रांचीं माखलीं ॥१६॥ हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिली लोकांचीं शरीरें बळें । परि जीवित्वदेहींची शिसाळें । अवश्य कीं राखिलीं ||१७|| तैशीं शरीरामाजी परंतु, हे आपले दुःख निष्कारण आहे, हें अर्जुनाला कळेचना, आणि मग त्याचें तें निरर्थक आणि निष्कारण कापरें अधिकाधिकच वाढूं लागलें. ९ तो बोलूं लागला, कीं, "अहो, पहा, पहा, जशीं अभ्रं गगनांत विरून जावीं, तशीं तरवारी व चिलखतें यांच्यासह दोन्ही सैन्यं तुमच्या तोंडांत गडप झालीं !४१० अहो, विश्वप्रळयाच्या अंतीं जेव्हां सृष्टीवर काळ रागावतो, तेव्हां तो जसा एकवीस स्वर्गाना पाताळांसकट कवटतो, ११ किंवा देव प्रतिकूल झालें म्हणजे जशी कवडी कवडी जमवून धनसंग्रह करणाराची सर्व संपत्ति जेथल्या तेथेच आपोआप नाहींशी होते, १२ त्याप्रमाणें शस्त्रास्त्रांनी थाटलेलीं हीं दोन्ही सैन्ये एकत्र मिसळून या तोंडांत शिरलीं, परंतु, देवाची रेषा अशी आहे, कीं, त्यांपैकी एकही त्या तोंडांतून सुन बाहेर निसटत नाहीं ! १३ अशोकाचे कोवळे कोंब उंटानें चावले म्हणजे जसे फुकट जातात, तसे हे लोक या तोंडांत नम्र होत आहेत. १४ पण मुकुटांसकट दांतांच्या कैचींत सांपडलेलीं ह्रीं डोकीं कशी पीठ होऊन जात आहेत पहा ! १५ तीं त्या मुकुटांमधली रत्नें कांहीं दांतांच्या फटींत अडकली आहेत, कांहींचा चुरा होऊन तो जिभेच्या मूळावर पसरला आहे, आणि कांहीं दाढांच्या टोंकांना डकून राहिली आहेत ! १६ हे पाहून असें वाटतें कीं, विश्वरूप काळानें लोकांची शरीरें चळाने गिळून टाकली, पण जीवदेहाचीं हीं मस्तकें मात्र शिल्लक राहू दिलीं आहेत. १७ त्याप्रमाणेच १ दालतवारीसह. २ द्रव्यसंग्रह करणाराची. ३ कोभ. ४ मस्तकें. ५ फढींत. ६ अप्रें, टोके,