पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥ ९९ ॥ कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया । मियां प्रार्थनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥ ४०० ॥ मागां थोडिया बहुवा उपपत्ति । येणें सांगितलिया विभूति । तैसा नसेचि मा पुढती । वैसलों ॥ १ ॥ म्हणोनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी टाके । माझ्या कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेले काह्या ॥ २ ॥ पूर्वी अमृतही हाता आलें । परि देव नसतीचि उगले | मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥ ३ ॥ परि तें ऐकवगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजीवडें । आणि तिये अवसरींचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥ ४ ॥ आतां हा जळता वारा के वेंटाळे । कोणाही विपा भरलें गगन गिळे । महाकाळेंसी कें खेळें | आंगवत असे ॥ ५ ॥ ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जीवातु । परि न देखे तो प्रस्तुतु | अभिप्राय देवाचा || ६ || जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेटाळला होता मोहें बहुतें । तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥ ७ ॥ अरे कोण्ही कोण्हातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं । हें विश्वरूपव्याजें हरि । प्रकटित असे ॥ ८॥ जो वीरश्रेष्ठ कर्ण, तोही येथें गेला, पार गेला ! आणि आमच्या पक्षाचे मुख्य मुख्य वीर तर केवळ केरासारखे झाडून टाकलेले दिसतात ! ९९ हाय हाय, परमेश्वरा ! कृपाप्रसादाचा हा काय विपरीत परिणाम झाला ? अहो, मी मुद्दाम याचना करून, या गरीब बिचाऱ्या जगावर भलताच प्रसंग ओढवून आणला कीं ! ४०० मागें देवांनी थोड्याबहुत आपल्या दिव्य विभूति स्पष्ट करून सांगितल्या, परंतु तेवढ्याने माझी हौस पुरेना ! आणि मग आणखी विभूति जाणण्याचा हट्ट घेऊन बसलों. १ तेव्हां, भोक्तृत्व कांहीं झालें तरी खास टळत नाहीं. आणि होणार गोष्टीप्रमाणेंच माणसाला बुद्धि होते, हेच खरे ! माझ्या कपाळी लोकांनीं खापर फोडावयाचें होतें तें चुकणार कसें ? २ प्राचीनकाळीं देवांच्या हातीं अमृत पडलें तरीही त्यांना संतोष होईना, म्हणून मग जसें अखेरीस काळकूट विष उत्पन्न केलें, ३ परंतु एका परीनें तें काळकूटही कमी प्रतीचं गणले पाहिजे; कारण त्याचा प्रतिकार होणं शक्य होते आणि श्रीशंकरांनी त्या प्रसंगींचें संकट निस्तरलेही. ४ पण आतां हा जळता वारा कोणी आवरावा ? हें विषाने भरलेले गगन आतां कोण गिळील बरें ? महाकाळाबरोबर झुंज खेळण्याचे सामर्थ्य कोठे आढळणार ? ” ५ अशा रीतीनें दुःखाने शिणत अर्जुन आपल्या अंतःकरणांत शोक करीत होता, परंतु त्याला श्रीकृष्णांचा अभिप्राय मुळींच कळला नाहीं. ६ अर्जुन जें म्हणत होता, कीं, 'मी मारणार, आणि हे कौरव मरणार, ' आणि अशा रीतीनें जबरदस्त मोहाच्या पाशांत सांपडला होता, तो मोह पार झाडून टाकण्याकरितां ( अनंतें) देवांनी हें आपलं गूढ रहस्य त्याला दाखविलें होतें. ७ 'अरे, कोणी कोणाला मारीत नाहीं, मीच सर्वांचा संहार करतों, ' हें तत्त्व विश्वरूपाचें निमित्त करून श्रीकृष्ण अर्जुनाला प्रकट करीत होते. ८ १ टळेल. २ कसे. ३ एक पक्षी, एका परीनें४ अंगबळ.