पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३८७ कटकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥ हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥ ९१ ॥ अमीच त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्व सहैवावनिपालसङ्गैः । भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६ ॥ सम० - हे सर्वही जे धृतराष्ट्रपुत्र त्यांचे सहाय क्षितिपाळमात्र । भीम स्वयं द्रोणहि कर्ण हाही जे आमचे वीर समस्त कांहीं ॥ २६ ॥ आर्या—हे धार्तराष्ट्र सारे आणिकही भूमिपाळ तत्पक्षी । भीष्म द्रोणहि कर्णहि तैसे जे वीर आमुच्या पक्षीं ॥ २६ ॥ ओवी - दुर्योधनादिसर्व । जयांचे समुदाव । भीष्मद्रोणादि देव । मुख प्रवेशती ॥ २६ ॥ नोहेति हे कौरवकुळींचे वीर | आंधळया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं ॥ ९२ ॥ आणि जे जे यांचेनि सावाये । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी ।। ९३ ।। मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आधोरणी न था । देतासि मिठी ॥ ९४ ॥ त्रावरिचील मार । पैदातींचे मोगैर । मुखात भार । हारपताति मा ॥ ९५ ॥ कृतांताचिया जावळीं । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोडीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥ ९६ ॥ चतुरंगा परिवारा। संजॉडियां रहेंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कैसा तुष्टासि बरवा ॥ ९७ ॥ हां गा भीष्मा ऐसा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥ ९८ ॥ अहा सहस्रकराचा केला. तों हें विघ्नच उभे राहिलें ! हाय ! हाय ! आतां विश्वसंहार निखालस झालाच ! महाराज, अहो तुम्ही विश्वाला ग्रासूं लागलांच कीं ! ३९० अहो, मला हें प्रत्यक्षच दिसत नाहीं का, कीं तुम्ही आपलीं असंख्य तोंडें वासून जिकडे तिकडे या सैन्यांना गिळीत आहां ! ९१ हे कौरवकुळांतले वीर नाहींसे होत आहेत. हे आंधळ्या धृतराष्ट्राचे मुलगे सर्व परिवारासह तुमच्या तोंडांत पडले, पडलेच पहा. ९२ आणि यांचे मित्र म्हणून जे जे नाना देशांचे राजेरजवाडे आले आहेत, त्यांचे नांवही सांगायला कोणी मागें राहू नये, असे तुम्ही त्या सर्वाना पार गिळून टाकीत आहां ! ९३ हत्तींचे ताफेच्या ताफे तुम्ही घटाघट गिळीत आहां आणि माहुतांच्या टोळ्यांनाही कवळीत आहां ! ९४ तोफखान्यावरील लोक गोळे आणि पायदळाचे समुदाय यांचे भारेच्या भारे तोंडांत टाकीत आहां । ९५ जीं यमाची भावंडं आहेत, आणि ज्यांतील एकेक सर्व विश्वाला गिळून टाकील, अशा कोट्यवधि शस्त्रांचीं जुडगीं तुम्हीं सगळींच्या सगळीं स्वाहा करीत आहां ! ९६ हत्ती, घोडे, रथ, व पायदळ, या रणांतील चतुरंगपरिवाराला, आणि घोडे जोडलेल्या रथांना, तुम्ही दांत न लावतांच गट्ट करीत आहां, मग, देवा, यांत तुम्हांला काय मोठा संतोष वाटतो तं कळत नाहीं. ९७ सत्य व शौर्य या गुणांत ज्याच्या तोलाचा दुसरा कोणीही नाहीं, त्या भीष्मांना आणि ब्राह्मण जे द्रोणाचार्य त्यांनाही, हाय हाय ! तुम्ही ग्रासीत आहां ९८ अहो, सूर्यपुत्र १ सोबती, साथीदार. २ मदमस्त हत्तीचे समुदाय. ३ माहुतांच्या टोळ्यांना ४ तोफखान्यावरील लोक, ५ पायदळाचे समुदाय, झुंडी ६ भावंडे, ७ घोडे जुंपलेल्या रथांना.