पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हैं ॥ ८१ ॥ ऐसें करिसी म्हणोनि जरि जाणें । तरि हे गोष्टी सांगावी कां मी म्हणें । आतां एक वेळ वांचवीं जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि ॥ ८२ ॥ जरि तूं गोसावी आमुचा अनंता । तरि सुई बोडण माझिया जीविता । सांठवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥ ८३ ॥ आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासि हैं उपरतें । संहारूं आदरिलें ॥ ८४ ॥ म्हणोनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरी संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया । पासोनियां ॥ ८५ ॥ हा ठायवरी पुढतपुढती । तूतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ति । भेडा जाहलों ॥ ८६ ॥ जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडीं । जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥ ८७ ॥ परि तयाआंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा | तुवां आमुचाचि घोंटु भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥ ८८ ॥ कैसा नव्हतां प्रळयाचा वेळु | गोवा तूंचि मिनलासि काळु । वापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥ ८९ ॥ अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां । आणि तत्काळ सर्व सुखाचा ठणठणाट झाला ! देवा, आतां हें आपले अपरंपार पसरलेलें विश्वरूप आवरून घ्या, आवरून घ्या ! ८१ तुम्ही आपलें हें स्वरूप आटोपून घेणारच आहां, हें मला माहीत असतांही मी एवढी काकुळती कां करतों, असें विचाराल, तर, आतां एक वेळ या आपल्या स्वरूपाच्या संहारक कृतीपासून माझा प्राण वांचवाच ! ८२ देवा, जर तुम्ही आमचे अनंतस्वरूप गुरुमहाराज असाल, तर आमच्या प्राणाच्या आड आतां आपली ढाल घाला, आणि हा महामारीचा प्रळयकारक पसारा पुन्हां माघारा आवरून गुप्त सांठवून ठेवा. ८३ हे प्रभो, देवदेवा, आपण लक्षांत घ्या. या विश्वाला जीवविणारे चैतन्य तुम्हीच आहां; पण तें सर्व विसरून, आज तुम्ही उलट संहाराचेंच कार्य आरंभलें आहे, हें काय ? ८४ म्हणून, देवराया, आतां शांत, कृपाळू व्हा; आपली ही माया आटोपा; आणि मला या प्रचंड भयापासून सोडवा ! ८५ हा वेळपर्यंत मी पुन्हां पुन्हां केवीलवाणेपणानें तुमची काकुळती करीत आहे, इतका मी, हे विश्वरूपा देवा ! आज केवळ भेकड बनलों आहे. ८६ आणि पूर्वी हाच मी कसा होतों, तर इंद्राच्या स्वर्गीय राजधानीवर शत्रूचा हल्ला पडला, तेव्हां मी एकट्यानंच तो परतविला, आणि प्रत्यक्ष मृत्यूच्याही मुखावलोकनाचे मला कधींही भय वाटलें नाहीं. ८७ परंतु, देवा, हे आजचें प्रकरण असें साधंसुधं नाहीं ! येथे तुम्ही काळावरही चढाव करून या सर्व विश्वासकट आमचाही घोंट घेऊ पहात आहां ! ८८ खरोखर पाहिलें तर हा कांहीं प्रळयाचा काळ नव्हता; पण तुमची काळस्वरूपाची मध्येंच कशी गांठ पढली कोण जाणे! आणि तत्काळ हा बापडा त्रिभुवनाचा गोळा अल्पायुषी झाला ! ८९ अहो दैव कसें हें उलटें फिरलें ! शांतिलाभाकरितां प्रयत्न १ ढाल, रक्षणाचे साधन, २ म्याड, भागूबाई. ३ उलगडा, पेंच दूर करणे. ४ मध्येंच, अवचित.