पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३८५ धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोय ही कवणेकडा । न लभे एथ || ७३ || ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहे चराचरी । जी न बोलें तर काय करीं । कैसेनि राहें ॥ ७४ ॥ सम०- दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसंनिभानि । दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५ ॥ - दंष्ट्रा कराला विकराळ तोंडें देखोनि कालाग्निसमें उदंडे । नेणें दिशाही सुखही सुरेशा प्रसन्न तूं होय जगनिवासा २५ आर्या- दंष्ट्रा कराल वदनें तुझीं काळाग्नितुल्य देवेशा । पाहुनि दिशाहि भुललों सुखहि न मज हो प्रसन्न जगदीशा ॥ २५ ॥ ओवी - दाढा विक्राळ मुखाभीतरी । जैसा अनि प्रगटला प्रळय अवसरीं । तेणें तेजें दिशा न कळती मुरारी । सुख न पर्ने जगन्निवासा ॥ २५ ॥ 1 अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें || ७५ ॥ असो दांतदादांची दाटी । न झांक मी दों दों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥ ७६ ॥ जैसें तक्षका विप भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें । कीं अग्नेयास्त्र परजिलें । वज्राभि जैसें ॥ ७७ ॥ तैशीं तुझीं व प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥ ७८ ॥ संहारसमयींचा चंडानि । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेछु । तैं काय एक न जळे ॥ ७९ ॥ तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे । आतां भुललों मी दिशा न देखें । आपण नेणें ॥ ३८० ॥ मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें । आतां जोपाणी नानाप्रकारें सैरावैरा धावाधावी करतो, परंतु त्या विचाऱ्याला या ठिकाणीं कोठेंच थारा सांपडत नाहीं. ७३ अशा या विश्वरूपाच्या महामारीनें चराचराचें जीवित नष्ट झालें आहे. देवा, हें बोलूं नये, तर स्वस्थ तरी कसें रहावें ? ७४ परंतु, अहो, महाभयंकर तोफ फुटून डोळ्यांपुढे अखंड दिसत राहावी, त्याप्रमाणें तुमचीं हीं अकटोविकट प्रचंड मुखें माझ्यापुढे पसरलेली दिसत आहेत. ७५ पण इतकेंच नाहीं, तर दांत आणि दाढा यांची विलक्षण दाटी झाल्यामुळें व ती ओठांच्या झडपांत न समावल्यामुळें, दोन्ही ओठांवर अनेक प्रव्यकारक शस्त्रांचे दाट कांटेरी कुंपणच जणूं काय झालें आहे ! ७६ जसें तक्षकाला नवीन विष पाजावं, किंवा काळोख्या रात्रीत भूत संचारावें, किंवा अग्नीच्या अस्त्राला विजेचें पुट द्यावे, ७७ तसाच तुमच्या भयंकर तोंडांत भरलेला आवेश बाहेर उतास जात आहे, आणि या आवेशाच्या रूपाने आमच्यावर मरणाचे लोंढेच येत आहेत, असे भासतें. ७८ जेव्हां विश्वसंहार करणारा प्रचंड वारा आणि महाकल्पांत करणारा प्रयाग्नि, या दोघांची मिळणी होते, तेव्हां त्यांच्या योगानें कोणती वस्तु बरें जळणार नाहीं ? ७९ तशीं तुमचीं हीं भयंकर वदनें पाहून आमचा धीर आम्हांला सोडून कसा जाऊं नये? आतां मी इतका भ्रांत झालों आहें, कीं, मला विशाही दिसत नाहीं, आणि स्वतांचेही भान होत नाहीं ! ३८० थोडेंसें तुमचें विश्वरूप पाहिले, १ मग. २ आवर, आटोप. ४९