पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी दाढांचे ॥ ६३ ॥ आणि ललाटपटाचिये खोळे | कैसे भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे | कंडवसां राहिले ॥ ६४ ॥ ऐसें वाऊनि भयाचें भोजं । एथ काय निपजवूं पहातोसि काज । तें नेणों परि मज । मरणभय आलें ॥ ६५ ॥ देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे | केले तियें पावलों प्रतिफळें । बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥६६॥ अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें | वांचे कीं न वांचे ॥ ६७ ॥ एहवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळे तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥ ६८ ॥ परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा | तया अंतरात्मयाही निवळा । शियारी आली ।। ६९ ।। बाप साक्षात्काराचा धुं । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ||३७०॥ देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजले आहे अंतःकरणीं । तें सांवरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसे ॥ ७१ ॥ तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥ ७२ ॥ जीव विसंवावयाचिया चाडा | सैंघ वांकडे आंकडे दिसत आहेत. ६३ आणि या ललाटपट्टाच्या खोळींतील डोळे तर जणूं काय भयालाच भय दाखवून दटावीत आहेत ! अहो, हे महामृत्यूचे भडकेच काळोखांत बसले आहेत का काय, असें वाटतें ! ६४ देवा, असें भयंकर सांग आणून, आपण कोणतें कार्य साधूं पहात आहां ? मला कांहीं तें कळत नाहीं, परंतु मला मरणाचें भय मात्र कवळीत आहे, हें खरें ! ६५ देवा, तुमचें विश्वरूप पाहाण्याची भलतीच हौस मी धरली, तिचें फळ मात्र मला चांगलें लाभलें ! महाराजा, तुमचें दर्शन मला झाले, आतां माझे डोळे अगदीं पाहिजे होते तसे निवाले ! ६६ अहो, हा जड देह गेला, तर त्याची काय एवढी क्षिति आहे ! परंतु माझें चैतन्य तरी आतां टिकतें कीं नाहीं याचाही वानवाच आहे ! ६७ असं नसतें, तर भयाने नुसतें शरीर कांपेल, कदाचित् क्षणभर मनही फार तर संतप्त होईल, किंवा बुद्धिसुद्धां किंचित् भिईल, आणि अभिमानाचाही विसर पडेल; ६८ पण जो यांच्याही पलीकडचा व जो केवळ आनंदमूर्तीच असावा, त्या माझ्या निश्चळ अंतरात्म्यालाही आज शिसारी भरली आहे ! ६९ अहो, केवढे सामर्थ्य हें या साक्षात्काराचें ! माझा सर्व बोध आज पार गळून गेला ! आतां हा गुरुशिष्यसंबंध तरी कसा टिकणार कोणास ठाऊक ! ३७० देवा, तुमच्या या दर्शनाने माझ्या अंतरंगांत जे दुर्बळपण घुसेलें आहे, त्याला सांवरून धरण्याकरितां धैर्याची गवसणी मी करूं पहात आहे, ७१ तां माझें सर्व धैर्यही नाहींसे झालेले आढळत आहे, कारण त्यालाही तुमचं विश्वरूपदर्शन घडलेच ! पण हे असो; माझ्या पदरांत हा एक उपदेश मात्र चांगला पडला आहे. ७२ तो उपदेश हा कीं, जीव विसांवा लाभण्याच्या इच्छेनें इकडे तिकडे १ काळोखात. २ बाहुलें, सोंग. ३ कदाचित् ४ शिसारी, कापरें. ५ ओढ, प्रताप, बळ.