पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३८३ त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे । ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥ ५४ ॥ तेवींचि एकासारिखें एक नोहे । वर्णावर्णाचा भेदु आहे । हो कां प्रळयीं सावावो लाहे । वन्ही ययाचा ॥ ५५ ॥ जयाचिये आंगींची दीप्ति येवढी | जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥ ५६ ॥ कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र की महापुरीं पडिला । विपाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥ ५७ ॥ हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥ ५८॥ परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटिलिया अंतराळ | आकाशासि केव्हळ । पडोनि ठेलें ॥ ५९ ॥ ना तरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरी । तें उघडलें हाटकेश्वरीं । जेविं पाताळकुहर ॥ ३६० ॥ तैसा वक्त्रांचा विकाशु | माजी जिव्हांचा आगळाचि आवेशु | विश्व न पुरे म्हणोनि घांसु । न भरीचि कोडें ।। ६१ ।। आणि पाताळव्याळांचिया फूत्कारी । गरळज्वाळा लागती अंबरी । तैसी पसरलिये वदनदरी | माजी हे जिव्हा ॥ ६२ ॥ काढूनि प्रळयविजूची जुंबाडें । जैसे पन्ना सिले गंगनाचे हुंडे । तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत मावत नाहीं, आणि त्रिभुवनांतील वाऱ्यालाही जिला वेढा घालतां येत नाहीं, अशा यांच्या जळजळीत वाफेने प्रत्यक्ष अग्नींचा भडका उडून केवढा डोंबाळा होत आहे, पहा ! ५४ त्याप्रमाणेंच एक तोंड एकसारखं नाहीं, त्यांत वर्णभेद आहे, मग प्रव्यकाळीं अग्नि विश्वसंहारासाठीं यात्रेच साह्य घेतो की काय न कळे. ५५ ज्या स्वरूपाच्या शरीराची तेजस्विता इतकी आहे कीं त्रिभुवनाची राखरांगोळीच व्हावी, त्या तशा स्वरूपाला हीं अशीं तोंडें आहेत, आणि त्या तोंडांतही हे असे विशाळ व बळकट दांत आणि दाढा ! ५६ जणूं काय वाप्यालाच धनुर्वात व्हावा, किंवा स्वतः समुद्र महापुरांत सांपडावा, अथवा वडवानलाला बरोबर घेऊन विषानीनें मारण्यास सिद्ध महावें ५७ किंवा हळाहळ विषानें अग्नि भक्षण करावा, किंवा, मोठ्यांत मोठें नवल म्हटलें म्हणजे मरणालाच दुसऱ्या मरणाचें साह्य लाभावें, त्याप्रमाणे या सर्वसंहारक तेजाला हें तोंड फुटले आहे ! ५८ पण हैं मोठें तरी किती आहे म्हणून सांगावें ? जसें अंतराळ तुटून तें आकाशावर बुंथी घालून राहावें, ५९ किंवा पृथ्वीला काखेंत मारून हिरण्याक्ष बिळांत शिरला असतां, पाताळांतील महादेवाने पाताळाचे भगदाड उघडले, ३६० तसा या तोंडांचा विस्तार आहे, आणि अशा तोंडांतल्या जिभांचा कडाकाही विलक्षणच आहे ! फक्त हें विश्व आपल्या एका घांसालाही पुरेसे नाहीं, म्हणून जणूं काय ही मूर्ति त्याचा कौतुकानेही चट्टामट्टा करीत नाहीं ! ६१ आणि पाताळींच्या नागांच्या फूत्कारांतील विषाच्या ज्वाळा जशा आकाशाला जाऊन पोहोंचाव्या, तशा या पसरलेल्या तांडाच्या दरीसारख्या जबड्यांत ही जीभ भासत आहे. ६२ प्रळयकाळच्या विजांची जाळीं काढून, जसे गंधर्वनगरीतील मेघांचे वाडे शृंगारावे, त्याप्रमाणे या ओठांवर धगधगणाऱ्या दाढांचे १ सोबती, मदतगार, २ कवळ, आवरण. ३ शृंगारिले. ४ आकाशांतील वाडे, मेघांचे राशी, ५ ओठावर.