पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कां सर्वसंहारें मातलें मरण । तैसें अतिभिंगुळवाणेपण | वदनीं तुझिये ॥ ४६ ॥ हे बापडी लोकसृष्टि । मोटंकी येवी पाहिली दिली । आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली ॥ ४७ ॥ तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥ ४८ ॥ एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जे तुज लोकांचें काइ वाटे । तूं ध्यानसुख हैं भोगी ॥ ४९ ॥ तरी जी लोकांचें कीर साधारण । वांयां आड सूत वोडंण । केवीं सहसा म्हणें प्राण | माझेचि कांपती || ३५०॥ ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मज भेणें मृत्यु लपे । तो मी एथें अहाळवाहळी कांपें । ऐसें तुवां केलें ॥५१॥ परि नवल वापा हे महामारी | इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ।। ५२ ।। नभःस्पृशं दीप्तमनेकवर्ण व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४ ॥ सम०- - अत्युच्च तेजोमय वर्ण चित्र प्रचंड ज्याचें मुख दीप्तनेत्र । ऐशा तुतें देखुनि अंतरात्मा दुःखी न जाणे सुख धैर्यवत् ॥ २४ ॥ आर्या - बहुवर्ण नभःस्पर्शी विस्तृत मुख दीप्त विपुल नेत्रांस । तेज सख्या तुज पाहुनि गेलें मम धैर्य पावलें त्रास ॥२४॥ ओवी - अत्युकट विचित्र । प्रचंडदीप्त नेत्र । ऐशासि देखोनि सर्वत्र । धैर्य आणि शांति न पवे ॥ २४ ॥ ठेलीं महाकाळेंसीं हटें टें । तैसीं कितीएकें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥ ५३ ॥ गगनाचेनि वाडपणें नाकळे । बाहेर निघत आहेत ! ४५ इतकेंच नव्हे, तर काळानें युद्धाला बोलवावें किंवा प्रळयानें मरणाला पोसावें, त्याप्रमाणें तुमच्या तोंडांवर भयंकरपण दिसत आहे ! ४६ ही गरीब बिचारी भूतसृष्टि तुम्हीं आपल्या नजरेनें किंचित् पाहिली मात्र, तांच ती यमुनेच्या कांठच्या कालियविषानें करपलेल्या वृक्षाप्रमाणं दुःखानें करपून गेलेली दिसते ! ४७ तुम्ही म्हणजे महामृत्यूचे सागर आहां, आणि त्यांत ही त्रिभुवनाच्या जीविताची होडी शोकाच्या वादळानें एकसारखी डोलत आहे. ४८ महाराज, यावर तुम्ही रागावून जर कदाचित् असें म्हणाल, कीं, 'तुला या लोकांबद्दल एवढे वाटून घेण्याचें कारण काय ? तूं आपलें खुशाल या विश्वरूपदर्शनाचें सुख भोग म्हणजे झाले ! ' ४९ तर, देवा, माझें म्हणणें असें आहे, कीं, महाराज, मी ही या लोकांच्या काहणीची ढाल उगाच मध्यें धरली आहे; 'कां' म्हणून विचाराल, तर माझेच प्राण खरोखर थरथर कांपत आहेत ! ३५० ज्या मला संहार करणारा रुद्रभितो, ज्या माझ्या भयाने प्रत्यक्ष यमही लपतो, तोच मी या प्रसंगीं थरथर कांपत आहे; अशी तुम्ही माझी अवस्था केली आहे ! ५१ हे दयाळू प्रभो, सगळ्यांत मोठा चमत्कार हा कीं, जरी याला 'विश्वरूप' असें नांव असले, तरी ही खरोखर महामारीच आहे. अहो हिच्या भ्यासुरपणानें प्रत्यक्ष भयालाही टेंकीस आणिलें आहे ! ५२ पण, महाकाळाबरोबरही भयानकत्वांत स्पर्धा करतील, अशीं तुमचीं किती तरी रागीट मुखें आहेत ! अहो यांच्या वाढीपुढें आकाशही ढांचे पडत आहे ! ५३ अहो, गगनाच्या विशाळपणांतही जी १ भयंकरत्व. २ किंचित्. ३ दुखःरूपी यमुनेच्या ४ घातलें. ५ ढाल, सबब ६ पराजय,