पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला १३ हाचि एक रक्षावा । मी तैसा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥ २४ ॥ तस्य संजनयन् हर्ष कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥ १२ ॥ सम० -तों दुर्योधन संतोषा ऐसा भीष्म पितामह । गजनि सिंहनादाते प्रतापी शंख वाजवी ॥ १२ ॥ आर्या - ऐकुनियां नृपवचना त्यासि कराया तर्हे प्रमोदातें । गजनि सिंहनादै करि तो कुरुवृद्ध शंखनादातें १२ ओवी - वडील भीष्म प्रतापिया । दुर्योधना हर्ष उपजावया । सिंहनाद करूनियां । प्रतापें शंख वाजवी ॥१२॥ 1 या राजाचिया बोला । सेनापति संतोपला । मग तेणें केला । सिंह- नादु ॥ २५ ॥ तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ २६ ॥ तयाचि तुलिगोसवें । वीरवृत्तीचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ २७ ॥ ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य वधिर जालें । जैसें आकाश का पडिलें । तुटोनियां ॥ २८ ॥ घडघडीत अंवर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ २९ ॥ तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें । तंव दळामाजि रणतुरें । आस्फुरिलीं ॥ १३० ॥ ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः । सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १३ ॥ सम० -- तो वायें शंख भेर्यादि पणवानकगोमुखें । वाजविलीं एकसरें झाला तो ध्वनि तुंबळ ॥ १३ ॥ आर्या-मग शंखासह भेरीपणवानकगोमुखादि रव दाटे । जेणें शब्देकरुनी पृथ्वी आकाश सर्व कोंदटे ॥ १३ ॥ ओवी - मग शंख आणि भेरी । पणवानकें घेऊनि करीं । गोमुखादि गर्जिली एकसरीं । थोर नाद झाला ॥१३॥ उदंड सैंघ वाजतें । भयानकें खाखातें । महाप्रळयो जेथें । धांकडांसी ॥ ३१ ॥ तेथ भेडांची कवण मातु । काचेयां केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ ३२ ॥ भेरी निशाण मांदळ । शंख कोहळा भोंगळ । तुम्हीं सर्वानी या एकट्या भीष्मांचेच रक्षण करावें. माझ्याप्रमाणेंच तुम्हीं त्यांना मान द्यावा, कारण या आमच्या एवढ्या सैन्याची बळकटी त्यांच्यावरच अवलंबून आहे. २३, २४ दुर्योधनराजात्रे शब्द ऐकून सेनापति भीष्मांना संतोष झाला व त्यांनीं मोठा रणघोष केला. २५ तो विलक्षण घोष दोन्ही सैन्यांत असा घुमला, कीं, त्याचा प्रतिध्वनि कोठेच समावेना, असें झाले. २६ त्या प्रतिध्वनीसरसा वीर्यस्फूर्तीच्या उसळीनें श्रीमान् भीष्मांनीं आपला अलौकिक शंख फुंकला. २७ या रणघोषाचा व शंखघोषाचा जेव्हां एक मेळ झाला, तेव्हां त्रैलोक्याचें कानटाळेंच बसले, जणूं काय गगनच कडाडून खाली कोसळलें ! २८ तेव्हां आकाश गडाडलें, समुद्र वर उसळला, आणि संत्रस्त झालेले स्थावरजंगम विश्व चळचळां कांपूं लागलें ! २९ या महाघोषाच्या गर्जनेनं गिरिगुहा दुमदुमून जात आहेत, तोंच सैन्यामध्ये रणवाद्यांची धुमाळी सुरू झाली. १३० भयानक व कर्कश असे असंख्य वाद्यांचे ताफे वाजूं लागतांच, जेथे मोठमोठ्या धडधाकटांना- सुद्धां हा प्रत्ययकाळच वाटू लागला, ३१ तेथे भ्याडांची तर गोष्ट बोलावयास नको ! कच्चे - अर्धवट धीराचे - कस्पटाप्रमाणेच उडाले ! किंबहुना काळालाही अशी धडकी बसली कीं, तो पुढें येईच ना ! ३२ १ प्रतिध्वनीसह, पडसादाबरोबर. २ धीटांना ३ झांजा.