पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा रूपं महत्ते वहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् । बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्रा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ॥ २३ ॥ सम० - वद्रूप मोठें बहु नेत्र तोंडें भुजांघ्रि मांड्या उदरें उदंडें । ३८१ दंष्ट्राकराला बहु ज्यांत कांहीं देखोनि भ्याले जग आणि मीही ॥ २३ ॥ आर्या-श्यामाजीं बहु दाढा मांड्या मुख उदर नयन पद कर ते । विक्राळ घोर तूझें रूप जगासह मला व्यथा करते २३ ओवी - रूप आहे बहु मुखं नेत्र । महाबाहो ऊरुपदादि विचित्र । बहुत उदरें विक्राळ दाढांचे चरित्र । तेणें लोकांसहित माझें मन भय पावलें ॥ २३ ॥ जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुंयाणें पाहलें । जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥ ३८ ॥ हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे । याचें सन्मुखपण जोडे । भलतयाकडुनी ॥ ३९ ॥ ऐसें एकचि परि विचित्रें । आणि भयानकें बहु व । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंत- भुजा ॥ ३४० ॥ अनंत चारु वाहु चरण | बहुदरें आणि नानावर्ण । कैसें प्रतिवदनीं मातलेपण | आवेशाचें ॥ ४१ ॥ हो कां महाकल्पाचिया अंतीं । तैवकलेनि यमें जेउततेउतीं । प्रळयामीचीं उजितीं | आंबुखिलीं जैसीं ॥ ४२॥ ना तरी संहारत्रिपुरारीची यंत्रें । कीं प्रळयभैरवांची क्षेत्र । नाना युगांत- शक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोडविलीं ॥ ४३ ॥ तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रे जी प्रचंडें । न समाती दरीमाजी सिंहांडे । तैसे दर्शन दिसती रागीट ||२४|| जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघती संहारखेचरें । तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । कोटलिया दाढा ||२५|| हें असो काळें अवंतिले रण । अहो, यांच्या डोळ्यांचें आज नशीब उघडलें, यांच्या मनाला सुखाची चंगळ झाली, कारण, यांनी आज तुमचें हें विश्वरूप पाहिलें आहे. ३८ हें तीन्ही लोकांना व्यापणारें तुमचें रूप पाहून देवही चमकतात, परंतु आज तें कोणाही पामराला समोर पाहण्यास लाभलें आहे ! ३९ अशा प्रकारचें हें रूप एकच आहे, परंतु नानाप्रकारचीं भयंकर मुखे, अनेक डोळे, शस्त्रे धारण करणारे असंख्य हात, ३४० असंख्य मांड्या, असंख्य बाहुदंड व चरण, अनेक उदरें, नाना वर्ण, असें हें स्वरूप आहे. प्रत्येक मुखांत आवेश तरी कसा उसळत आहे, पहा ! ४१ अहो ज्याप्रमाणें विश्वप्रळयाच्या अखेरीस संतापलेल्या यमाने जिकडे तिकडे प्रळयानीचे भडके उडवून द्यावे, ४२ किंवा विश्वसंहार करणाऱ्या रुद्राचीं शस्त्रास्त्रे, अथवा प्रळय मांडणाऱ्या भैरवांच्या टोळ्या, अथवा कल्पांत करण्याची शक्ति ज्यांना आहे अशा तोफा भूतमात्राचा चिवडा करण्यासाठी जशा सुटाव्या, ४३ त्याप्रमाणं, हे प्रभो, तुमचीं प्रचंड तांडे जिकडे तिकडे दिसत आहेत. विशाळ सिंह गुहंत न मावल्यामुळे त्याची कोधमुद्रा अर्धवट दरीबाहेर दिसावी, त्याप्रमाणे तुमचे उग्र दांत मुखाबाहेर दिसत आहेत. ४४ जशी काळ्याकुट्ट रात्रीचा आश्रय घेऊन घातकी पिशाचे मोठ्या उत्सवानें संचाराला निघावी, त्याप्रमाणं प्रळयांच्या संहाराच्या रक्ताने माखलेल्या तुमच्या दाढा तोंडांतून १ सुकाळ, चंगळ. २ धाक. ३ रागावलेल्या ४ भटके. ५ पसरली. ६ शस्त्रास्त्रे ७ टोळ्या. ८ तोफा ९ भूतांच्या खिचड़ीवर १० प्रचण्ड सिंह. ११ घातक भूतें. १२ किटलेल्या. १३ बोलाविलें,