पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८० सार्थ श्रीज्ञानेश्वरी ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें । तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥ ३३० ॥ आणि महर्षि अथवा सिद्ध । विद्याधरसमूह विविध | हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥ ३१ ॥ रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्वोष्मपाश्च । गन्धर्वयक्षा सुरसिद्धसङ्घा वीक्षन्तं त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२ ॥ सम० - आदित्य रुद्र । ष्टवसूंत आदि प्रसिद्ध आणीकहि देव वेदीं । गंधर्वयक्षादिक वासुदेवा हे पाहती विस्मित तूज देवा ॥ २२ ॥ आर्या - वसुरुद्रादित्यमरुत् विश्वेदेवोष्मपाश्विनीकुमर । गंधर्व यक्ष साध्यहि विस्मित पाहाति सिद्धवर अमर ॥ २२ ॥ ओवी - रुद्रादित्यवसु । ऋषि विश्वेदेव मरुद्गण आणि जे सु । यक्ष आणि राक्षसु । देखतां आश्चर्य पावले ॥ २२ ॥ हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ॥ ३२ ॥ अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥। ३३ || हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं । हे महामूर्ति दैविकी । पाहत आहाती ॥ ३४ ॥ मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं । करित निजमुकुटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥ ३५ ॥ ते जयजय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट || ३६ ॥ तिये विनयद्रुमाचिये आठवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी । म्हणोनि करसंपुटपलवीं । तूं होतासि फळ ॥ ३७ ॥ सांपडलों; विषयाच्या जाळ्यांत गुंतलों; आणि स्वर्ग व संसार या दोन लिगाडांत अडकलों आहों. २९ या संकटांतून आमची सोडवणूक तुमच्यावांचून कोण करणार आहे ? म्हणून आम्ही सर्व जीवेंभावें तुम्हांस शरण आलों आहों. " असे ते, देवा, तुम्हांला म्हणत आहेत. ३३० आणि इकडे हे महर्षि अथवा सिद्ध आणि अनेक विद्याधरांचे समुदाय ' स्वस्ति' वचन उच्चारून तुमची स्तुति करीत आहेत. ३१ रुद्र व आदित्य यांचे समूह, अब वसु, एकूण एक साध्य, दोन्ही अश्विनीकुमार, विश्वेदेव आणि वायुदेव, हे सर्व आपल्या वैभवासह ३२ तसंच पितृदेव, गंधर्व, यक्ष, राक्षस, इंद्रप्रभृति देव, आणि सिद्ध इत्यादि, ३३ हेही सर्व आपापल्या स्थळांतून उत्सुक दृष्टीने तुमची ही देदीप्यमान विशाळ आकृति पहात आहेत. ३४ मग, पाहातां पाहातां, अंतरंगांत विस्मयपूर्ण होऊन, ते आपलीं मस्तकें, हे प्रभो, तुमच्या चरणावर आंवाळीत आहेत. ३५ ते 'जयजय' शब्दाच्या घोषाच्या कलकलाटानें सप्त स्वर्गाना नादवून टाकीत आहेत, आणि हात जोडून आपल्या मस्तकावर ठेवून तुम्हांला नमन करीत आहेत. ३६ त्या विनयवृक्षांच्या वनांत सत्त्वभावांचा वसंतकाळ सुखावला असल्यामुळे, त्यांच्या त्या जोडलेल्या हस्तरूप पालवीला तुझें रूप हेंच फळ आपोआप लटकलें आहे. ३७ १ वसंतकाळ.