पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३७९ त्रासु ॥ २१ ॥ तेवींचि तुज देखिलियासाठीं । काय सहसा तुज देवों येईल मिठी । आणि नेदीं तरी शोकसंकटीं । राहों केविं ॥ २२ ॥ म्हणोनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढां तूं तंव अनावरु । नयेसि घेवों || २३ || ऐसा माझारिलिया सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । ऐसा हा ध्वनि जी फुडा । चजवला ज ॥ २४ ॥ जैसा औरंवळला आगीं । तो समुद्रा ये निवावयालागीं । तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं । आगळा विहे ॥ २५ ॥ तैसें या जगासि जाहलें । तूतें देखोनि तळमळत ठेलें । अमी हि त्वां सुरसङ्घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयां गृणन्ति । स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१ ॥ सम० - प्रवेशती हे सुरवृंद देहीं कृतांजळी वर्णिति भीत तेही । हो स्वस्ति ऐसें ऋषिसिद्ध मात्र म्हणोनि तूतें स्तविती विचित्र ॥ २१ ॥ आर्या-येती सुर शरण तुला कोणी कर जोडुनी भयें गाती । स्वस्थ असें वंदुनि मुनि सिद्धहि करिती स्तुती तसे गाती ओवी - तुझे ठार्थी देव प्रवेशती । कितीक भयेंकरुनि स्तुति करिती । देवऋषि स्तविती । देवा तुजकारणें ॥ २१ ॥ यामाजीं पैल भले | ज्ञानशूरांचे मेळावे || २६ || हे तुझेनि आंगिकें तेजें | जाळून सर्व कर्माचीं वीजें | मिळत तुज आंतु सहजें । सद्भावेंसी ॥ २७ ॥ आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु | तु प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥ २८ ॥ देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विपयवागुरे आंडलों । स्वर्गसंसाराचिया सांकडलों । दोहीं भागीं ।। २९ ।। घडल्यामुळें विषयेच्छेचा वीट येऊन उद्वेग उत्पन्न झाला आहे. २१ तसंच हें तुमचें रूप पाहिल्यावर तुम्हांला एकदम प्रेमानें मिठी मारतां येईल काय ? आणि अशी मिठी मारतां आली नाहीं, तर मग या शोकसंकटांत आम्हीं राहावं तरी कसं ? २२ म्हणून, तुम्हांला सोडून मागें सरावें, तर हा जन्ममरणाचा अपरिहार्य संसार 'आ' करून आडवा येतो; आणि पुढें जावें तर तुमचें हें अद्भुत अतर्क्य स्वरूप आम्हांला सहन होत नाहीं. २३ अशा प्रकारें मधल्यामध्येच या संकटांत त्रैलोक्याचे फुटाणे उडत आहेत. अशी माझ्या अंतरंगाची खरी खरी अंतःस्थ स्थिति झाली आहे. २४ आगीनें होरपळलेला एकादा मनुष्य अंगाची लाही शमविण्याकरितां समुद्राकडे यावा आणि मग उसळणाऱ्या पाण्याच्या लाटांच्या दर्शनानें त्यानं अधिक भयभीत होत घावरें व्हावें, २५ तसेच या जगाला झालेलं आहे, तें तुमच्या दर्शनानं नुसतं तळमळत आहे ! याच स्वरूपांत ते पहा, पलीकडे देवांचे मोठमोठे जमाव आहेत. २६ हे, तुमच्या अंगप्रभेनें कर्माचीं बीजं खाक करून, व आपलें सट्टप मिळवून, तुमच्या स्वरूपांत लय पावत आहेत. २७ आणि इकडे हे दुसरे कोणी स्वभावतःच भित्रे असलेले, सर्व भावें तुमच्याकडे वळून व दोन्ही हात जोडून प्रार्थना करीत आहेत. २८ ते प्रार्थना करितात, कीं, "हे प्रभो, आम्ही मायासागरांत १ आकविता येत नाहीत. २ मधल्या ३ अनुभवास आला. ४ होरपळलेला,