पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૩૦૮ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ॥ १३ ॥ इये वदनींचिया उवा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा । विश्व तोतलें अतिक्षोभा । जात आहे ॥ १४ ॥ द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकन दिशश्व सर्वाः । तं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २० ॥ सम० - दिशा दहा आणिक अंतरिक्षा तूं एकला व्यापिसि अंबुजाक्षा । देखोनि में अद्भुत रूप उग्र महात्मया लोक भिती समग्र ॥ २० ॥ आर्या- भूस्वर्गांचें अंतर दिशाहि एक्याचि त्वां असे व्याप्त । उग्र स्वरूप अद्भुत पाहूनि तुझें त्रिलोक संतप्त ॥ २० ॥ ओवी - तुझेनि एकै स्वरूपतेजें । पृथ्वीनभ व्यापिले सहजै । दशदिशांत दाटलें उम्र रूप अद्भुत जें । तें देखोनि भ्याले लोक भयं ॥ २० ॥ कां जे द्यौर्लोक आणि पाताळ | पृथिवी आणि अंतराळ | अथवा दशदिशा समीकुळ । दिशचक्र ।। १५ ।। हें आघवेंचि तुवां एकें । भरलें देखत आहें कौतुकें । परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेविं ॥ १६ ॥ ना तरी अद्भुतरसाचिया कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाँळी | तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ॥ १७ ॥ नावरे व्याप्ति हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण । सुख दूरी गेलें परी प्राण । विपायें धरिजे ॥ १८ ॥ देवा ऐसें देखोनि तूतें । नेणों कैसें आलें भयाचे भरितें । आतां दुःखकलोळी झळंवतें । तीन्ही भुवनें ॥ १९ ॥ न्हवीं तुज महात्मयाचें देखणें । तर भयदुःखासि कां मेळवणें । परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवता मज ॥ ३२० ॥ जंव तुझें रूप नोहे दिलें । तंव जगासि संसारिकचि गोमटें । आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला दाढा चाटीत, दांतांच्यामध्यें लळलळत आहे ! १३ या मुखाच्या दाहाने आणि सर्व शरीराच्या तेजानं या समस्त विश्वाला ताप लागून तें अतिशय कासावीस होत आहे. १४ आणखी, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, अंतराळ, दाही दिशा, आणि कोंदट झालेले क्षितिजाचें वर्तुळ, हें एकूण एक सर्व तुम्ही सहजासहजी व्यापून टाकिलेलें मला दिसत आहे. परंतु गगनासह सर्व या भयानक रूपाने गिळल्यासारखेच दिसत आहे; १५,१६ किंवा या तुमच्या रूपाच्या अद्भुत रसाच्या लाटेंत चौदा भुवनांचीही कड्याळें सांपडली आहेत, मग अशा प्रकारें हें अद्भुत दर्शन माझ्या बुद्धीला कसे बरे आकळितां येईल ? १७ हें विलक्षण व्यापकपण मर्यादित करता येत नाहीं, हें तेजाचं प्रखरत्व सोसवत नाहीं. जगाचें सुख तर दूर पळालेच, पण त्याचें प्राणधारण मात्र कसेबसे होत आहे ! १८ देवा, असें तुमचें स्वरूप पाहून भयाची भरती कशी आली, हेंही नीटसं कळत नाहीं. आतां या दुःखाच्या लोंढ्यांत त्रिभुवन बुडून जात आहे. १९ खरें म्हटलें तर तुम्हां महात्म्यांच्या दर्शनांत भयाचे मिश्रण कां बरं असावं ? पण तुमच्या दर्शनाच्या ज्या गुणांचा अनुभव मला येत आहे, त्यांत सुख मात्र मुळींच नाहीं, हें खरें. ३२० जोपर्यंत तुमचें रूप डीस पडत नाहीं, तोपर्यंतच जगाला संसारसुख गोड वाटते. परंतु तुमच्या विश्वरूपाचे दर्शन आतां १ तावलें, तापले. २ स्वर्ग. ३ कुंद झालेले. ४ क्षितिज, ५ कड्याळ, गढडी. ६ बुडते. ७ पाहिलें.