पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । त्वमव्ययः शाश्वतधर्मगोता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८ ॥ सम - तूं शुद्ध तें अक्षर जें कळावें आत्मा जगाचा निधि जो स्वभावें । तो वासी शाश्वत धर्मपाल जो नित्य तूं अव्यय सर्व काळ ॥ १८ ॥ ३७७ 'आर्या -- अक्षर तूं वेद्य परम अव्यय आश्रय जगा न सामान्य । शाश्वत धर्मै श्राता जुनाट पूरुष मला असा मान्य ॥ १८ ॥ ओवी - तूं परम अक्षर आणि ज्ञेय । या विश्वाचें तूं निधान मूलमय । तूं शाश्वत धर्मरक्षक अक्षय । आदिपुरुष मज मानला । देवा तूं अक्षर | औटोविये मात्रेसि पर। श्रुति जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥ ७ ॥ जें आकाराचे आयतन । जें विश्वनिक्षेपकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ||८|| तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥ ९ ॥ अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तवाहुं शशिसूर्यनेत्रम् । पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९ ॥ सम०—आद्यंत ना मध्य अनंतवीर्य भुजा अनंता तव नेत्र सूर्य । शशी मनोनेत्र मुख हुताश पाहे तथा जो त्रिजगत्प्रकाश ॥ १९ ॥ आर्या-दीप्ताग्नि मुखहि बहुकर रवि-शशि नयन बहुवीर्य या तूनें। आद्यंत मध्यही ना पाहे मी स्वप्रकाशहेतूतें ॥ १९ ॥ ओवी - अनंतवीर्या नकळे आदिमध्य अंत । अनंतभुजा शशिसूर्यनेत्र | प्रज्वलित अग्नि जैसा तेज रखित । त्रिजगत्प्रकाशा ॥ १९ ॥ तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यं तूं अनंतु । विश्ववाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥ ३१० ॥ पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसादलीळा । एक रुसी तमाचिया डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥ ११ ॥ जी एवंविधा तूतें । मी देखतसें हैं निरुतें । पेटलें प्रळयामीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ॥ १२ ॥ वाणवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत । देवा, वेद ज्यांला शोधण्याचा प्रयत्न करितात, ते अक्षर, व ओंकाराच्या साडेतीन मात्रांपलीकडचे तुम्हीच आहां. ७ जें सर्व आकाराचें मूळ घर व ज्यांत सर्व विश्व सांठविलें जातें तें अक्षय्य, गूढ व नाशरहित, तत्त्व तुम्हीच आहां. ८ तुम्ही धर्माचें जीवन आहां, स्वयंसिद्ध व अविकृत आहां, आणि सर्वविश्व नियंता, व छत्तीस तत्त्वांपलीकडचें सदतिसावें तत्त्व, असा जो पुराणपुरुष, तो तुम्हीच आहां, असें मला आज समजलें. ९ तुम्ही आदि, मध्य, व अन्त यांविरहित आहां, तुम्ही स्वयंसिद्ध व अपार आहां; तुमचे बाहु व पाय विश्वव्यापी आहेत. ३१० चंद्र व सूर्य हे तुमचे डोळे आहेत व त्यांचा कृपेचा व रागाचा खेळ सारखा चालू आहे. कोणावर रागाच्या गढूळ डोळ्याने कोपत आहां, तर कोणावर कृपादृष्टीची पावर करीत आहां. ११ अहो देवा, अशा प्रकारचें मीच तुमचें स्वरूप खरोखरच पाहात आहे. जणूं काय प्रळयाग्नीचा भडकलेला डांवाळाच आहे ! १२ वणव्याने पर्वत पेटले म्हणजे जसे ज्वाळांचे धडाके वस्तुमात्राला कवळीत उसळतात, तशी तुमची जीभ, अहो, तुमचं हें मुख म्हणजे १ साडेतीन मात्रेला, ओंकाराला २ पलीकडचा. ३ घर. ४ सर्व विश्व सांठविण्याचे कोठार. ४८