पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणोनि जाणें ॥ ९७ ॥ परि कायसे वा हें चोज । विस्मयो करावयाहि पाडु नाहीं मज । चित्त होऊनि जातसे निर्बुजे । आश्रयें येणें ॥ ९८ ॥ हें एथ आथी कां येथ नाहीं । ऐसें विश्वासोंही न ये कांहीं । नवल अंगप्रभेची नवाई | कैसी कोंदली संघ ॥ ९९ ॥ एथ अमीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत । ऐसें तीव्रपण अद्भुत । तेजाचें यया ।। ३०० ।। हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टि आघवी । कीं युगांतविजूंच्या पालवी । झांकलें गगन ॥ १ ॥ ना तरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि मांचु बांधला अंतराळां । आतां दिव्य ज्ञानाचांहि डोळां । पाहवेना ||२|| उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदासु । पडत दिव्यचक्षूंमही त्रासु । न्याहाळतां ॥ ३ ॥ हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळामिरुद्राचिया ठायीं गूढ । तो तृतीयनयनाचा मढुं । फुटला जैसा ॥ ४ ॥ तैसें प्रसरलेनि प्रकारों । सैंघ पांचैवनिया ज्वाळांचे वेळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥ ५ ॥ ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी । नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥ ६ ॥ आणि माझ्या इच्छेबरोबर, अगदीं तिच्या वेगाइतक्याच वेगानें, तुम्ही एकदम, अहो विश्वनाथा, विश्वरूप झालां, हॅ मला आतां समजून चुकलें आहे. ९७ परंतु, हा केवढा प्रचंड अद्भुत चमत्कार आहे ! हें पाहून चकित होण्याइतक्या विस्मयाचें बळही आमच्याजवळ नाहीं ! अहो, हें आश्चर्य पाहून चित्त केवळ वेर्डेच होऊन जातें ! ९८ हे विश्वरूप येथें आहे कीं येथें नाहीं, याचाही नीटसा भरंवसा मनाला येत नाहीं. अहो, या मूर्तीच्या प्रभेची काय नवलाई सांगावी, हा सर्व विश्वसमुदाय येथे कोंडून तरी कसा ठेवला आहे ? ९९ या तेजाच्या विलक्षण प्रखरपणाचा असा चमत्कार आहे, कीं, यानें अनीचीही दृष्टि करपते आणि सूर्यही काजव्यासारखा फिका पडतो ३०० अहो, या प्रचंड तेजाच्या सागरांत सर्व सृष्टि जणूं काय गडप झाली आहे, किंवा कल्पान्तकाळींच्या विजांनी आकाश व्यापून टाकलें आहे ! १ किंवा विश्वप्रळयाच्या वेळच्या अग्निज्वाळा तोडूनझोडून हा हवेंत उंच माळाच जणूं काय बांधला आहे ! माझ्या दिव्य ज्ञानडष्टीलाही हा पाहावत नाहीं. २ याची देदीप्यमान प्रभा क्षणक्षणी इतकी वाढत आहे, याचा धडाका व दाहकपणा इतका विलक्षण आहे, कीं, याकडे पहात असतां, दिव्य डोळेही त्रासून जातात. ३. अहो, असेंच वाटतं, कीं, महाप्रळय करणारा जो अम्मीचा भडका महारुद्राच्या तिसऱ्या डोळ्यांत गुप्त होता, तो भडका त्या डोळ्याची कळी उमलून आज जणूं काय बाहेर पडला आहे ! ४ अशा प्रकारें पसरलेल्या या दाहक प्रकाशाने पंचाग्नीच्या ज्वाळांचं काहूर येतांच सर्व ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत ५ देवा, अशा प्रकारचा अद्भुत पुंज असें तुमचें हें स्वरूप म्हणजे मी आज एक विलक्षण नवलच पाहिलं म्हणायचं ! अहो, तुमच्या व्यापकपणाला व तेजस्वीपणाला सीमाच दिसत नाहीं. ६ १ बेचें, पिसें. २ पदराने, ३ माळा ४ अत्यंत दाहक, ५ कळा, कळी. ६ पांच अम्मीच्या ७ घडाके ८ ब्रह्मांड.