पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३७५ कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्होवती मन डोळे । खेंव देऊ जाइजे तरि आकळे । दोहींचि वाहीं ॥ २९० ॥ ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा । कीं आमुचियाचि दिठी सलेपा । जे सामान्यत्वें देखती ॥ ९१ ॥ तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षु केला । म्हणोनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥ ९२ ॥ परि मकरतोंडामागिलेकडे । होतासि तो तूंचि एवढें । रूप जाहलासि हैं फुडें । वोळखिलें मियां ॥ ९३ ॥ किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमंतम् । पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ १७ ॥ सम० - करीं गदा चक्रहि जो किरीटी तेजोब्धि सर्वत्रह दीप्ति मोटी । सर्वत्र देखें तुज उग्ररूप दावाग्निसूर्यद्युति जो अमूप ॥ १७ ॥ आर्या-चक्र-किरीट- गदाधर दिससी सर्वत्र चहूंकडे दीप्त । सप्रभ अशक्य आह्मा अचिंत्य दीप्तार्क वन्हिसम आप्त ॥१७॥ ओंवी - मस्तकीं मुगुट गदाचक करीं । सर्व तेजोमय दीप्ति अवधारीं । तैसें तेज देखिलें शरीरीं । दावानीसारिखें ॥१७॥ नोहे तोचि हा शिरीं । मुकुट लेइलासि श्रीहरी । परि आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहु हैं ॥ ९४ ॥ तेंचि हैं वरिलियेचि हातीं । चक्र परिजिर्तया औयती । सांवरितासि विश्वमूर्ति । ते न मोडे खूण ॥ ९५ ॥ येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । गोरे सांवरावया गोविंदा | संसरिलिया ॥ ९६ ॥ आणि तेणेंचि वेगें भक्तप्रेमामुळें तें साजिरें गोजिरें मधुर रूप धारण करतां. ८९ अहाहा ! तें चार बाहूंचें सांवळें स्वरूप पाहिल्याबरोबर मन व डोळे, हीं दोन्ही गार होतात, आणि गळामिठी घालण्याला हात पुढें सरसावावे, तों त्यांच्या कव्यांत तें सहज सांपडते. २९० अहो विश्वरूपा देवा, असें गोजिरवाणें रूप तुम्ही आमच्यावर कृपा करण्याकरितां धारण करतां ना ? कीं, ज्यांना तुम्ही असे सामान्य व गोड दिसतां, त्या आमच्या दृष्टीच दूषित आहेत ? ९१ तें कसेंही असो, पण आतां माझ्या दृष्टीचा मळ साफ गेला आहे, आणि तुम्ही सहजासहजी माझे डोळे दिव्य प्रकाशमय केले आहेत, म्हणून तुमचा खरा खरा महिमा मला यथास्थित पाहतां आला. ९२ पण रथाच्या दांडीच्या मकराकार तोंडाच्या मागल्या बाजूस बसलेले जे तुम्ही, त्या तुमचें हें जगड्व्याळ रूप आहे, हें मात्र मीं आज स्पष्ट ओळखलें. ९३ इतकेंच नव्हे, तर अहो श्रीकृष्णा, हा डोक्यावरचा मुकुटही तुमचा नेहमींचाच आहे, पण त्याची आतांची प्रभा आणि विशालता कांहीं विलक्षणच आहे. ९४ आणि त्या वरच्या हातांत वाटोळं फिरविण्याच्या बेतानें चक्रही धरलें आहे. हे विश्वरूपा, ही चक्राची ओळखीची खूण कांहीं नाहींशी झालेली नाहीं. ९५ दुसऱ्या बाजूकडे असलेली ही गदा ओळखीचीच नाहीं काय ? आणि हे खालचे दोन्ही शस्त्रहीन मोकळे हात घोड्यांचे लगाम उचलण्याकरितां पुढे सरसावत आहेत. ९६ १ निवतात, २ गोजिरवाणी, ३ फिरविण्याच्या बेताने ४ लगाम.