पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ७९ ॥ परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असें देखतु । जे आदि मध्य अंतु । तीन्ही नाहीं ॥ २८० ॥ एन्हवीं गिंवासिले आघवा ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं । म्हणोनि त्रिशुद्धी हे नाहीं । तीन्ही एथ ॥ ८१ ॥ एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता । देखिलासि जी तत्त्वता । विश्वरूपा ॥ ८२ ॥ तुज महामृर्तिचिया आंगीं । उमटलिया पृथक् मूर्ति अनेगी । लेइलासि वाणपरीची आंगीं। ऐसा आवडत आहासी ॥ ८३ ॥ नौना पृथक् मूर्ति तिया द्रुमवली | तुझिया स्वरूपमहाचळीं । दिव्यालंकार फुली फळीं । सासिन्नलिया ॥ ८४ ॥ हो कां जे महोदधि तूं देवा । जाहलासि तरंगमूर्तिहेलावा । कीं तूं एक वृक्ष बरवा। मूर्तिफळी फळलासी ॥८५॥ जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्री गगन गुढलें । तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप ॥ ८६ ॥ जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय त्रिजगती । एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ति । कीं रोमा जालिया ॥ ८७॥ ऐसा पवाड मांडूनि विश्वाचा | तूं कवण पां एथ कोणाचा । हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥ ८८ ॥ तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा । मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥ ८९ ॥ परंतु, प्रभो, तुमच्या रूपांत एक कमतरता दिसते, ती ही, कीं, त्यांत आदि, मध्य, व अंत, ही तिक्कल मात्र कोठेही आढळत नाहीं. २८० नाहींतर तुम्हीं सर्वच ठाव व्यापिला आहे. परंतु यांचा लाग कोठेच दिसत नाहीं. तेव्हां हे तीन्ही येथें नाहींतच असा निश्चित निर्णय होतो. ८१ अशा प्रकारें, हे आधिमध्यांतहीन अनंता विश्वनाथा, मी तुमचें विश्वरूप खरोखर पाहिलें आहे. ८२ देवा, तुमच्या या प्रचंड मूर्तीत सर्वच मूर्ति निरनिराळ्या आपापल्या परीनें बिंबलेल्या आहेत, जणूं काय तुम्ही हे नानारंगांचे अंगरखेच घातले आहेत, असें भासतें ! ८३ किंवा या निरनिराळ्या मूर्ति म्हणजे तुमच्या देहरूपी महापर्वतावर फुटलेल्या तरुवेलीच आहेत आणि त्या दिव्यालंकाररूपी फुलाफळांनी भारावून आल्या आहेत ! ८४ अथवा, देवा, तुम्ही महासागर असून, त्या मूर्तिरूपी तरंगांनी हालत आहां, किंवा तुम्ही एक विशाळ वृक्ष आहां, आणि या मूर्ति म्हणजे त्याला लागलेलीं फळंच होत ! ८५ हे प्रभो, जसें भूतमात्रांनी भरलेले पृथ्वीतळ दिसावें, किंवा नक्षत्रांनी खचलेलें आकाश असावें, तसें अनंत मूर्तींनीं कोंदलेलें तुमचें स्वरूप दिसत आहे. ८६ अहो, ज्या एकेका मूर्तीच्या अंगीं सबंध त्रिभुवन उत्पन्न होतें व लयही पावतें, त्या एवढाल्याही मूर्ति तुमच्या देहांवर जणूं काय केसांप्रमाणे आहेत ! ८७ मग, इतका विस्तार ज्यांचा आहे, असे तुम्ही आहां तरी कोण, हें पाहूं लागलों, तो तुम्ही म्हणजे आमचेच सारथि श्रीकृष्ण, असें आढळून आलें ! ८८ तेव्हां हे मुकुंदा, मला, विचार करतां असें कळतें, कीं, तुम्ही सदा सर्वकाळ असेच व्यापक आहां, परंतु केवळ १ लाग, शोध. २ नानापरीच्या वर्णाचा ३ आंगडी, ४ भासत, ५ किंवा ६ गोड, गोंडस .